देवरी:तालुक्यातील देवरी नागरी सहकारी पतसंस्था येथील आठ नित्यनिधी संकलनकर्ते बेमुदत आमरण उपोषण सहकार कार्यालयासमोर सुरू केले असुन या बेमुदत आमरण उपोषणाला बसलेल्या एका संकलन कर्त्यांनी खासदार महोदयांचा देवरी तालुका दौरा असल्याची माहिती कळताच दूरध्वनीवरून वार्तालाप करून यासंबंधीची माहिती माजी आमदार संजयजी पुराम यांना दिली.लगेच यासंबंधी दाखल घेत या विषयी माहिती खासदार महोदयांना दिली असता मंगळवारी बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाच्या पाचव्या दिवशी खासदार अशोक नेते यांनी भेट देऊन प्रकरण जाणून घेत तातडीने या प्रकरणी कारवाई करण्यात येईल. देवरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या लाखो रुपयाच्या वर आर्थिक गैरव्यवहारातंर्गत समस्या व वास्तव समजून घेत खासदार अशोक नेते यांनी सुरू असलेल्या संकलनकर्त्याच्या बेमुदत आमरण उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. उपोषण कर्त्यांशी त्यांनी संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणा संबधाने सखोल चर्चा केली व आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समजून घेतले.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा करून आर्थिक गैरव्यवहार प्रकरण मार्गी लावण्यासाठी योग्य प्रयत्नशील प्रयत्न केला जाईल.असे वक्तव्य यावेळी केले. याप्रसंगी माजी आमदार श्री.संजयजी पुराम, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, ता.महामंत्री विनोद भांडारकर,युवा मोर्चा चे महामंत्री नितेश वालोदे, हितेश डोंगरे,सुरेश राठोड,तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: देवरी येथील बेमुदत आमरण उपोषणाला खासदार अशोकजी नेते यांनी भेट देऊन चर्चा केली., ID: 28330
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: देवरी येथील बेमुदत आमरण उपोषणाला खासदार अशोकजी नेते यांनी भेट देऊन चर्चा केली., ID: 28330
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]