- भाजप केंद्रीय चुनाव समितीने माजी आमदार संजय पुराम यांना (छत्तीसगढ) राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगांव विधानसभा क्षेत्रासाठी प्रचार प्रमुख नियुक्त केले.
साखरीटोला:- (रमेश चुटे) नुकत्याच निवडणूक जाहीर झालेल्या छत्तीसगढ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष केंद्रीय चुनाव समितीच्या वतीने आमगाव/ देवरी मतदारसंघांतील माजी आमदार संजय पुराम यांची छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगांव विधानसभा क्षेत्रासाठी प्रचार प्रमुख म्हणून नियुक्त केले असून मोठी जवाबदारी सोपवली आहे. मागील निवडणुकीत थोडक्यात पराभूत होऊन सुद्धा सतत जनतेच्या संपर्कात राहणारे कुशल वक्ता माजी संजय पुराम यांना हिंदी, मराठी इंग्रजी, सह गोंडी भाषेचा चांगला अनुभव आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघात येत्या 2024 च्या निवडणुक तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्र भाजपच्या वतीने निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आले होते यात आमगाव/ देवरी विधानसभा क्षेत्रासाठी संजय पुराम यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आले हे उल्लेखनीय आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 271