सालेकसा येथे भव्य आदिवासी मेळावा
साखरीटोला:- (रमेश चुटे) गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकार व महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारच्या संकल्प शक्ती मुळे विकासाकडे वाटचाल करीत आहे. बजट मध्ये आदिवासी विकासाची झलक स्पष्ट दिसत असून आदिवासी बहूल जिल्ह्यामध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र व हमखास असा निधी विकासकामांना दिला जात असल्याने आदिवासी समाजाने आता विविध क्षेत्रात मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे, असे उदगार राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले. ते 27 आक्टोम्बर रोजी आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्रातील सालेकसा येथे पूर्ती पब्लिक स्कूल आवारात आयोजित भव्य आदिवासी मेळावा कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन क्षेत्राचे माजी आमदार व आदिवासी नेते संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा अध्यक्ष ॲड. येसुलालजी उपराडे, माजी आमदार भैरसिंह नागपुरे, गोंदिया/भंडाराचे संघटन मंत्री वीरेंद्र आंजनकर, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव वट्टी, सदस्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर मडावी. पस सभापती अंबिकाताई बंजार, प.स. सदस्य अर्चनाताई मडावी, सौ. प्रतिभाताई परिहार, सौ. शालिनीताई बडोले, जिल्हा महामंत्री राजेन्द्र बडोले, तालुका अध्यक्ष गुमानसिंग उपराडे, राजू पटले, नरेंद्र वाजपेयी, परसराम फुंडे, टिकेश बोपचे, उमेदलाल जैतवार, अध्यक्ष आदिवासी आघाडी सरोज परतेती उपस्थित होते. मान्यवरांना लेझिम पथक नृत्य संचालनात व्यासपिठावर आणण्यात आले. भारतमाता, वीरांगना राणी दुर्गावती, धरतीआबा वीर बिरसा मुंडा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार संजय पुराम यांनी आपल्या मार्गदर्शनात विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांशी मंत्रीमहोदयांना अवगत करण्याचे प्रयत्न केले. ना.विजयकुमार गावित यांनी केंद्र व विद्यमान महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाचा मंत्रालय आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. विविध पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंतराव वट्टी जिल्हाध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी यांनी केले तर उपस्थिताचे आभार आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष सरोज परतेती यांनी मानले.
