सालेकसा तालुक्यातील कृषी सेवा प्रतिष्ठाने तीन दिवस बंद राहणार

साखरीटोला-: (रमेश चुटे)
महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित विधायकांनुसार कृषी निविष्ठा व्यावसायिकांवर नवीन कायदे लादल्या जात आहे. त्या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी सालेकसा तालुक्यातील सर्वच कृषी प्रतिष्ठाणे आज पासून 4 नोव्हेंबर पर्यंत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सालेकसा तालुका अग्रो डीलर्स असोसिएशनच्या घेण्यात आला आहे.
त्यामुळे दि.2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत असे तीन दिवस कृषी निविष्ठा केंद्र बंद राहणार आहेत. यासंदर्भात सालेकसा तालुका अग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी गोंदिया तहसीलदार सालेकसा यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाने कृषी निविष्ठा व्यावसायिकांबाबत विधेयक क्रमांक ४० ते ४४ नुसार नवीन कायदे लादले आहेत. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी या कृषी निविष्ठा व्यावसायिकांकरीता अत्यंत जाचक व अन्यायपूर्ण असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. हे कायदे लागू झाल्यास कृषी निविष्ठा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अशक्य होणार असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे या कायद्यांविरोधात महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाईड सीड्स डिलर्स असोसिएशनमार्फत दि.२ ते ४ नोव्हेंबर कालावधित बंद पुकारलेला आहे. या बंदला सालेकसा तालुका अग्रो डीलर्स असोसिएशन पाठिंबा देणार असल्याचे बैठकीत ठरले आहे. त्यामुळे या कालावधीत सालेकसा तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित विधेयकांचा निषेध म्हणुन पहिल्या टप्प्यात तीन दिवस कृषी निविष्ठा केंद्रे बंद ठेवली जाणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचा कार्यकारणीमंडळ सरकारच्या संपर्कात आहे. मागणी मान्य न झाल्यास अधिवेशनच्या काळात सर्व व्यावसायिक आक्रमक भुमिका घेणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष लखनलाल अग्रवाल, उपाध्यक्ष प्रल्हाद मेंढे, सचिव सचिन बहेकार, कोषाध्यक्ष राजू डोंगरे, नितीन जैन, देवराम चुटे, शैलेश अग्रवाल, विजय मच्छीरके, आनंद सोनवाने, विश्वास कटरे, हिम्मतलाल नागपुरे यांनी दिली आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: सालेकसा तालुक्यातील कृषी सेवा प्रतिष्ठाने तीन दिवस बंद राहणार, ID: 29170

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर