Elgarlivenews (सुरेन्द्र खोब्रागडे उपसंपादक) आज दिनांक 20/11/2023 ला पंचायत समिती सालेकसा च्या आवारात ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे एक दिवसीय तालुकास्तरिय धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना अंतर्गत तालुकास्तरिय एक दिवसीय धरणे आंदोलन करून येत्या हिवाळी अधिवेशनात मोर्चा व आंदोलनाची सुरूवात.मागील 12 वर्षा पासून तंत्रस्नेही कुशल संगणक परिचालक म्हणून तुटपुंज्या मानधनावर कार्य करीत आहेत . त्यांना आजपर्यंत अनेकदा ग्राम विकास मंत्री यांनी लेखी आश्वासन देऊनही मानधनात वाढ केली नाही ज्यांच्या कार्य कुशलतेमुळे नाव रूपास आलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्प (C.S.C.2.0) सुरू असुन त्यांची नियुक्ती बाह्य कंपनी द्वारे केल्याने त्यांना फक्त मासिक 6930/- मानधनावर व त्यातही टिडीएस कपात करून राबविले जाते तरिही आज किंवा उद्या कायम होऊ या आशेवर बारा वर्षां पासुन अविरतपणे काम करूनही या महागाईत कुटुंबाचे कसे भागणार या विवंचनेत राज्यस्तरीय आंदोलने करण्याचे ठरविले आहे.
त्यांच्या प्रमुख मागण्या
1)किमान 20000 रूपये मासिक वेतन.व ग्रामपंचायत लिपिक च्या पदावर कायम करणे.
2)राज्यातील सर्व संगणक परिचालकांचे आकृतिबंधात समावेश करून महिन्याची तारीख निश्चित करणे.इत्यादी मागण्या करिता दिनांक 8/11/2023 पासुन 4/12/2023 पर्यंत आंदोलनाची रूपरेषा तयार करून शेवटी 11 डिसेंबर 2023 ला हिवाळी अधिवेशन नागपुर येथे राज्यस्तरीय विराट मोर्चा व धरणे आंदोलन करण्याचे निवेदन दिले आहे.
