सातगाव ग्रापंच्या उपसरपंच पदी श्वेता अग्रवाल यांची निवड
साखरीटोला-:
सालेकसा पंचायत समिती अंतर्गत सातगाव/ साखरीटोला येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महायुतीच्या सौ. श्वेता मनोज अग्रवाल यांची निवड झाली आहे. 9 सदस्यीय ग्रामपंचायत मधे येथील उपसरपंच सौ. अफरोज पठाण यांनी 16 /10/2023 रोजी पदाचा राजीनामा दिल्यामुळे ग्रामपंचायतचें उपसरपंच पद रिक्त झाले होते. तालुका निवडून अधिकारी व तहसीलदार सालेकसा यांचें पत्र क्र. अका/ग्रापनि/कावि/ 26/2024/दि. 02/02/2024 अन्वये दिनांक 12/02/2024 रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आले. यात सौ. श्वेता मनोज अग्रवाल यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी डी. टी. कठाणे हे होते. तर निवडणूक अध्याशी अधिकारी म्हणून सरपंच नरेश कावरे, तर निवडणूक सहाय्यक म्हणून ग्रामसेवक आर. एम. रामटेके यांनी सहकार्य केले. उपसरपंच पदी श्वेता मनोज अग्रवाल यांची निवडझाल्याबद्दल निवडणूक अधिकारी डी. टी. कठाणे, ग्रामसेवक आर. एम. रामटेके, सरपंच नरेश कावरे, ग्रामपंचायत सदस्य डाँ. अजय उमाटे, सुनीता चकोले, गौरव कोडापे, तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, सुनील अग्रवाल, पुर्थ्वीराज शिवणकर, रामदास हत्तीमारे,
मनोज अग्रवाल, देवराम चुटे, प्रेम कोरे, प्रेम दोनोंडे, ओमप्रकाश लांजेवार, विशाल चकोले, गगन छाबडा, धनराज कोरे, लांजेवार तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, व नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले