????साखरीटोला येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद
साखरीटोला/सालेकसा-: ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन शासनाच्या वतीने ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सातगाव/साखरीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प. सदस्य वंदनाताई काळे, तालुका वैधकीय अधिकारी डाँ. अमित खोडणकर, डाँ. किरण सोमाणी, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, डाँ. स्नेहल ठाकरे, डाँ. पल्लवी रामटेके, सामाजिक कार्यकर्ता राजू काळे, जिल्हा हिवताप अधीकारी विनोद चौहान, आरोग्य सेविका निलेश्वरी रहांगडाले, इंजी. ऋषींकुमार चुटे, रवी पडोळे, यांच्या हस्ते अकरा महिन्याचा बाळ त्रिशांक ऋषींकुमार चुटे, व सात महिन्याची चिमुकली ख़ुशी प्रतीक कोरे, या बालकांना प्लस पोलिओचें डोज पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आले. यावेळी सौ. मायाताई चुटे, सौ. सवीताई कोरे, सौ. बहेकार, सौ. शिवणकर, सुरेश दाते, आरोग्य केंद्रातील कर्मचारी माता पालक उपस्थित होते. सातगाव/साखरीटोला प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सातगाव, साखरीटोला, भजेपार, कारूटोला, माताटोला/नदीटोला, मक्काटोला, कडोतीटोला/रुंगाटोला, दुर्गुटोला, गांधीटोला, बापूटोला/चर्जेटोला, चीचटोला, हेटीटोला, सलंगटोला, दागोटोला, तेलीटोला/ तुमडीटोला, गिरोला, इसनाटोला, सोनारटोला, बोदलबोडी, भाडीपार, धानोली, दरबडा, बडटोला, घोंशी अश्या वेगवेगळ्या गावात एकूण 24 बूथ लावून लसीकरण केंद्र स्थापित करण्यात आले आहेत तसेच धानोली रेल्वे स्टेशनवर एक मोबाईल युनिट सुद्धा कार्यरत असून प्राथ. आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 1233 बालकांना 100 टक्के प्लस पोलिओ लसीकरण करण्याचें लक्ष निर्धारित आहे. त्याचबरोबर पल्स पोलिओ लसीकरण दिनानंतर प्लस पोलिओ पासून वंचित बालकांना ग्रामीण भागामध्ये तीन दिवस आय.पी.पो. आयच्या टीम द्वारे घरांना भेटी देऊन लसीकरण करण्यात येणार आहे.