आमगांव च्या संयुक्त विद्यमाने बुद्धवनकुटी येथून अध्यक्ष सुरेंद्रकुमार खोब्रागडे व भंते बुद्धघोष,विनय मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजता बुद्ध रॅली काढण्यात आली.
या रॅली मध्ये सोळा भिक्खू व तहसील परीसरातील गावाच्या बुद्धीष्ट महिला पुरुष व ,भीम आर्मी च्या युवक युवती सहभागी होऊन बुद्ध कुटी ते आंबेडकर चौक,गांधी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत रखरखत्या उन्हात रॅली काढून तहसील कार्यालय समोर सभा घेऊन भंते सुकेशनी, सुरेंद्रकुमार खोब्रागडे, भंते बुद्धघोष,निरु फुले यांनी मार्गदर्शन केले.व तद्नंतर तहसीलदार मोणीका कांबळे आमगांव यांना महामहीम राष्ट्रपती यांच्या नावाने निवेदन देऊन विनंती करण्यात आली की बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करुन महाबोधी महाविहार चा अवैध कब्जा काढून भारतातील एकमेव बुद्धगया बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या स्वाधीन करून भंते विनाचार्य यांची तात्काळ सुटका करावी अन्यथा आंदोलन उग्र करण्यात येइल. अशा प्रकारे निवेदन देण्यात आले. त्यावर तहसीलदार मोनिका कांबळे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन महामहीम राष्ट्रपती यांना पाठविण्याचे आश्वासन दिले.
रॅलीच्या यशस्वीतेसाठी
अध्यक्ष सुरेंद्रकुमार खोब्रागडे भारतीय बौद्ध महासभा आमगांव,महासचिव सुधीर टेंभुर्णे,भंते बुद्धघोष बुद्धवनकुटी आमगांव,
भिक्खूनी सुकेशिनी नागपूर
विनय मेश्राम,रमेश रामटेके
अँड.रंजीता खोब्रागडे,संगीता टेंभुर्णे,शारदा कोटांगले,निरु फुले,अविनाश मेश्राम,राकेश नागवंशी,अशोक बोरकर, सौरभ गडपांडे,आशिष बैलमारे,चरणदास मेश्राम,
नितेश नागवंशी,अरुण गडपांडे,मिनाक्षी नागवंशी,
रत्नमाला नागवंशी,रोहित गडपांडे,मुकेश नागवंशी,
बिजेता राऊत,रत्नमाला राउत,प्रकाश टेंभेकर,
सानिया बोरकर,यशोदा बोरकर,आरती मेश्राम,वैशाली मेश्राम,अजय चौधरी,कल्पना शहारे,प्रिती नागवंशी,लक्की बोरकर,विशेष गणवीर, प्रणाली नागवंशी व अनेक कार्यकर्ता उपासक उपासिका उपस्थित होते.
शिष्टमंडळात वरिल सर्वांचा समावेश होता.
