देवरीः- केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री जनजातीय उत्रत ग्राम अभियानास मंजुरी प्रदान केलेली असुन दुर्गम व अति दुर्गम भागात राहणा-या आदिवासी बांधवाच्या सर्वागीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उत्रत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.आदिवासी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तिकरणासाठी केंद्र सरकारतर्फे”प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गोंदिया जिल्हयातील 104 आदिवासी गावांमध्ये 15 जुन ते 30 जुन 2025 दरम्यान विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात थेट गावात जाऊन नागारिकांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गोंदिया, देवरी सालेकसा, आमगाव,गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी/मोर, सडक/अर्जुनी या तालुक्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या अनुसुचित जमातीच्या नागरिकांकरिता मतदार ओळखपत्र,आधार कार्ड,बॅक खाते, किसान क्रेडिट कार्ड, आयुष्यमान भारतकार्ड, किसान सन्मान निधी, जॉब कार्ड, असे अनेक दाखले त्यांच्या वास्तव्यावर जाऊन उपलब्ध करुन देण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माहिमेची मुख्य उदेश आदिवासी नागारिकांना केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ गावपातळीवर उपलब्ध करुन देणे हा आहे.मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणी जिल्हा व तालुका स्तरावर करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय गावांची संख्या पुढीलप्रमाणे:-गोंदिया-4,तिरोडा-3गावे,आमगाव-2गावे,सालेकसा-15 गावे,देवरी- 49 गावे,अर्जुनी/मोर-15 गावे,सडक/अर्जुनी-11 गावे,गोरेगाव-5 गावे
आदिवासी बहुल गावांमध्ये दिंनाक-15 ते 30 जुन पर्यत आयोजन -या गावामध्ये स्टॉल लावुन तेथे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलिस पाटील, महसुल सहायक, ग्रामपंचायत अधिकारी, मंडळ अधिकारी, नोडल अधिकारी हे शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त अनुसुचित जमातीच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवरी जिल्हा गोदियाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी केले आहे.
एका छताखालली मिळणार लाभ- अभियानाचा एक भाग म्हणुन धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या योजनेअंतर्गत जुन मध्ये विशेष मोहिम राबवुन देवरी जिल्हा गोंदिया प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील 104 गावांमध्ये 15 जुन 30 जुन पर्यत सकाळी 10.00 ते सांयकाळी 5.30 वाजेपर्यत जनजागृती शिबिराच्या माध्यमातुन मतदार ओळखपत्र, आधार कार्ड,रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र,जॉब कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड,पीएम-किसान,जनधन खाते असे अनेक दाखले व योजनांचा लाभ एका छताखाली व प्रत्यक्ष ग्रामस्तरावर जाऊन उपलब्द करुन देता येणार आहे.
विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.गोंदिया जिल्हयातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी जिल्हा गोंदिया च्या माध्यमातुन विविध तालुक्यातील गावांच्या उपक्रमात समावेश करण्यात आलेला आहे.यासोबत आरोग्य, अत्र व नागरी पुरवठा,पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, महसुल अशा विविध विभागांच्या योजनांचाही लाभ या शिबिरातुन नागरिकांना मिळणार आहे. या अभियानामुळे आदिवासी समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडुन घेण्यास मदत होईल. असा विश्वास गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी व्यक्त केला आहे. तसेच सर्व संबधित विभागांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा, अशा सुचना दिलेल्या आहेत.
आपला विश्वासु ( उमेश काशिद )
प्रकल्प अधिकारी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
देवरी जिल्हा गोंदिया
