गोंदियाः- केंद्र शासनाने गावाच्या विकास करण्यासाठी गावातील समस्या वर विकासात्मक चार्ट तयार करुन गावातील विविध घटकांचा विकास व्हावा यासाठी नऊ संकल्पना साकार केल्या आहेत.त्या संकल्पनेत युवकांना कौशल्यात्मक कार्यक्रम घेवुन त्यांना कमविण्याची संधी निर्माण व्हावी अशी व्यवस्था ग्रामपंचायत ने करणे आवश्यक आहे. गोंदिया जिल्ह्यातील कोणत्याच ग्रामपंचायत मध्ये युवक लोकांच्या विचारांना योग्य वळण लागण्यासाठी गाव लेवल वर विविध कार्यक्रम घेणे हे तेथील ग्रामपंचायत संरपच व सदस्याचे काम आहे.१५ वित्त आयोग हे गावाच्या विकासत्मक कामासाठी असतांनी जे युवक भविष्यात देशाचे चालक होणार आहेत त्यांना योग्य वळण देण्यासाठी शासनाने ९ संकल्पनेत तरतुद करुन ठेवली असतांनी शुध्दा ग्रामपंचायत यावर लक्ष देत नाही असे म्हणणे गोंदिया जिल्ह्यातील युवकांचे आहे. बालस्नेही गाव (Child friendly Village) 1. 1)100 % बाल मजूर मुक्त गाव.
2. 100% मुलांची शाळे मध्ये नोंदणी
करणे.
3. तस्करीच्या प्रकरणांना आळा.
4. बालविवाहाचे प्रमाण कमी करणे.
5. मुलांसोबत होणा-या सर्व प्रकारच्या
हिंसाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी
सुरक्षित वातावरण तयार करणे.
6. स्थानिक स्वशासनात मुलांचा
सहभाग असल्याची खात्री करणे.
7. निर्धेोक सुरक्षित आणि स्वच्छ
वातावरणाची खात्री करणे. यांचावर सरकार ने पैशा खर्च करण्याची तरतुद केली असली तरी प्रत्यक्षात ग्रामपंचायत लेवल वर असे कार्यक्रम ग्रामपंचायत ने घेतलेले नाही.त्यामुळे गावातील युवकांचे ऑनलाईन गेम,वाढते हिंसाचार,शिक्षणाकडे दुर्लक्ष वाढले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी,गटविकास अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
