नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर येथील बोरेटे पब्लिक स्कूल ने शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत यंदाच्या वर्षी “गोल्डन स्कूल अवॉर्ड” मिळवला. विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय यशासह शिक्षकांच्या प्रेरणादायी योगदानामुळे हा सन्मान प्राप्त झाला.कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. वैशाली घोरमाडे मॅडम यांना “बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड”, गणित विषय अध्यापिका विजया बी. पाडोळे मॅडम यांना “बेस्ट मॅथ्स टीचर अवॉर्ड”, तर इंग्रजी विषय अध्यापिका वंदना त्रिपाठी मॅडम यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरीशाळेतील एकूण ७ विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाला. त्यामध्ये आलिया अन्सारी हिने विशेष कौतुकास पात्र ठरणारी कामगिरी बजावली. तसेच ५४ विद्यार्थ्यांनी “डिस्टिंक्शन” मिळवून शाळेच्या यशात भर घातली. या सन्मानप्राप्त शाळेच्या यशामागे शाळेचे चोख नेतृत्व, शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांचा मोठा वाटा आहे.विशेष आभार या यशस्वी वाटचालीसाठी शाळेच्या सचिव सौ. रुपाली धारपाळ यांना मॅडम, अध्यक्ष सौ. आशा बोराटे शिक्षण संस्थायांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षकीय व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थ्यांचे योगदानही लक्षणीय ठरले.शाळा व्यवस्थापन व पालकवर्गाने सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, आगामी काळात शाळा आणखी उंच भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
