देवरीः- देवरी तालुक्यातील रब्बी हंंगामाचे धान विकुन सलग दोन ते तीन महिण्याचा कालावधी झालेला आहे.सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या संस्थाचे पैसे शेतक-यांना त्यांच्या वेळेवर मिळत नसतील तर शासनाने शेतक-यांच्या बाबतीत काय योजना आखली आहे. शेतक-यांना रिकामे पैसे देण्यासाठी सरकार जाहीरात तर एवढ्या करतात की सरकार शेतक-यांना जणु स्वर्गाच्या पाळण्यात आनंदात झुलवतात.शेतकरी यांनी मेहनत करुन आपल्या शेतात लाखो रुपये खर्च करुन धान हे शासनाच्या संस्थेत विकुन शुध्दा वेळेवर पैसे मिळत नसतील तर सरकार शेतकरी बांधवाना काय समजतो हा मोठा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे युवा शेतकरी हे अत्यंत गंभीर झालेले आहेत.युवा शेतकरी लोकांना येणा-या काळात शेती कशी करायची हा मोठा प्रश्न युवा शेतक-यांच्या समोर आला आहे.सरकारच्या चुकीच्या पध्दतीमुळे येणा-या काळात युवा शेतकरी यांच्या आत्महत्या वाढण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
