देवरीः- महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवाच्या कुंटुबातील शेतक-यांचा अपघात झाला तर त्यांच्या कुंटुब हा निराधार होतो.त्यांच्या कुंटुबाला आधार म्हणुन महाराष्ट्र शासनाने गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना चे शासन निर्णय काढला आहे. शेतकरी कुंटुबाला कोणत्या कागद पत्राची आवश्यकता आहे या बदल शेतकरी कुंटुबानी कृषी ऑफीसला भेट देणे गरजेचे आहे.शेतकरी लोकांनी शासनाने दिलेल्या योजनाचा लाभ घेणे आवश्यक आहे. गोपिनाथ मुंडे अपघात निधीची रक्कम २ लाख रुपये आहे. देवरी तालुक्यातील शेतकरी अपघात झालेल्या 15 कुंटुबाना गोपिनाथ मुंडे अपघात योजनाचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये काही शेतकरी लोकांच्या फाईल मध्ये त्रुटी आहेत त्या पुर्ण करुन त्यांना शुध्दा या योजनाचा लाभ मिळणार आहे.देवरी तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी जास्त जास्त शेतकरी कुंटुबानी योजनेचा लाभ घेतला पाहीजे पण अयोग्य फाईल सादर करु नये.
