देवरीः- गोंदिया जिल्हा हा छत्तीसगड राज्याला लागुन आहे.मुंबई ते कलकत्ता हायवे क्रमांक 53 असे नाव देण्यात आले आहे.केंद्र शासनाने व राज्यशासनाने आंतरराजीय सिमा तपासणी नाका हा सिमेलगत करोडो रुपये खर्च करुन तयार करण्यात आला.सिमा तपासणी नाका हा कांटे लावुन रोडावरुन ओव्हरलोड जावु नये यासाठी तयार करण्यात आला.वाहन चालक यांनी सरळ रोडावरुन वाहन नेवु नये यासाठी कंपनी मार्फत गार्ड ठेवण्यात आले.हायवे क्रमांक 53 वर डिजीटल कॅमेरे लावण्यात आले. हायवे पोलिस हे चारचाकी वाहन तपासणी करित आहेत.त्यांच्या सामोरुन ट्रक मधुन माल खाली करुन हाड्रा घेवुन जात आहे तरी पोलिस त्यांच्या वर कोणतिही कार्यवाही न करता खुले आम त्यांच्या समोरुन जात आहे. सिमा तपासणी नाका सिरपुरबांध येथील वाहन निरिक्षक यांनी ठेक्यात घेतला की काय अशी अवस्था देवरी येथील सिमा तपासणी नाक्याची आहे.ट्रक चालक हे अशिक्षित असतात त्यांना काही गोष्टी समजत नाही.त्यांची कोणत्याच प्रकारची गोष्टी एकुन घ्यायला तयार नाही. प्रतिनिधी आमदार,खासदार,मुख्यमंत्री यांचा समावेश येथील भ्रष्टाचारात आहे की काय असे प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहेत. शासन अशा भ्रष्ट्राचारावर लगाम लावेल का याकडे जनतेचे कल आहे.
