देवरीः- केंद्र शासन वारंवार शेतकरी लोकांची थट्टा करण्यात आनंद व्यक्त करतो.शेतकरी लोकांना त्यांच्या खोट्या स्वप्नानात रंग भरण्यात सरकार मस्त आहे.उन्हाळी हंगामातील कित्येक शेतकरी बांधवाना त्यांच्या स्वतःच्या धानाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही.सरकारने बोनस घोषित केला बोनस शुध्दा शेतकरी लोकांच्या खात्यात आलेला नाही. शेतकरी लोकांच्या खिशात पैसे नाहीत तर ते आपल्या मुलांना व घरातील वस्तु खरेदी कसे करणार असे प्रश्न शेतकरी लोकांचे आहेत.शेतकरी लोकांची स्थिती सरकारने बघितली पाहीजे.शेतकरी लोकांनी गाईचे गोटे बांधकाम केले त्यांचे शुध्दा पैसे त्यांच्या खात्यावर आलेले नाहीत.सरकारने शेतकरी लोकांची थट्टा करने बंद करुन शेतकरी लोकांना योग्य न्याय देण्याची गरज आहे.
