माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे निधन:

🔽85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास;

🔽गोंदिया जिल्हा निर्मितीमध्ये मोठे योगदान
साखरीटोला/गोंदिया-: (रमेश चुटे)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रा. महादेव शिवणकर यांचे सोमवार (दि.20) रोजी सकाळी 8 वाजता आमगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर आज मंगळवार (दि. 21) रोजी सकाळी 10 वाजता साकरीटोला घाट वाघनदी सालेकसा मार्ग, आमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, व संजय शिवणकर एक मुलगी यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे गोंदिया जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. महादेव शिवणकर हे संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, अभ्यासू अर्थतज्ज्ञ, आणि अभ्यासपूर्ण भाषणासाठी प्रसिद्ध नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी जलसंपदा, वित्त आणि नियोजन मंत्री, विधानसभा सदस्य, तसेच लोकसभेचे खासदार म्हणून प्रदीर्घ आणि प्रभावी राजकीय कारकीर्द गाजवली. त्यांनी पाटबंधारे मंत्री असताना गोंदिया जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामुळेच गोंदिया जिल्ह्यात कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, कालीसरार, यांसारख्या सिंचन प्रकल्पांची निर्मिती झाली.
महादेवराव शिवणकर यांचा जन्म 7 एप्रिल 1940 रोजी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे झाला. त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघाचे अनेकवेळा प्रतिनिधित्व केले. ते 1978, 1980, 1985, 1995 आणि 1999 या निवडणुकांमध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. 1990 च्या दशकात महाराष्ट्रात मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच्या युती सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1995 ते 1997 मध्ये जलसंपदा मंत्री आणि 1997 ते 1999 मध्ये वित्तमंत्री म्हणून काम केले.
गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार
महादेवराव शिवणकर हे गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार ठरले होते. त्यांनी 26 जानेवारी 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना गोंदिया जिल्ह्याची घोषणा केली आणि 1 मे 1999 रोजी गोंदिया जिल्हा अस्तित्वात आणून कार्यभार सुरू केला. गोंदिया जिल्हा निर्मितीचे ते खरे शिल्पकार ठरले. मात्र, त्यांनी गोंदिया जिल्हा निर्मितीचे श्रेय सर्वांना दिले.
तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी
महादेवराव शिवणकर यांनी राज्याच्या राजकारणासोबतच देशाच्या राजकारणातही योगदान दिले. 2004 ते 2009 या काळात ते चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 2004 मध्ये खासदार म्हणून निवडून गेल्यावर त्यांनी संसदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी सर्वप्रथम केली होती. तसेच 26 जुलै 1975 रोजी आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
गडकरींनी नुकतीच घेतली होती भेट
अलिकडेच भाजप नेते नितीन गडकरी यांनी महादेवराव शिवणकर यांच्या आमगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे निधन:, ID: 30711

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर