देवरीः- देवरी तालुक्यातील उन्हाळी पिक देवरी तालुक्यातील 30 टक्के शेतकरी घेतात.उन्हाळी पिक जानेवारी महिण्यापासुन सुरु होते.उन्हाळी पिक हे सलग ९० ते ११० दिवसाचे असते.त्या कालावधी मध्ये शेतकरी पिकांची जोपसना करते व पिकांच्या माध्यमातुन आपला आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करतो पण काय शेतकरी वर्गाचा निर्सग एवढा छळ करतो की शेतकरी आत्महत्या करायला प्रवृत्त होतो की काय अवस्था होते. शेतकरी बांधवानो निर्सगाचा समतोल कसा होईल यासाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.जर आपल्याला शेती करायचा असेल तर निसर्गाशिवाय आपला कुणी मायबाप नाही. निसर्गाचा समतोल नसल्यामुळे आज शेतकरी बांधवाचे पिक हातात येवु शकत नाही.पाऊसाने कहर केल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे.माझे पिक हातात येणार की नाही हीच चिंता शेतकरी बांधवाना लागलेली आहे.शासनाने स्वामिनाथन आयोग लागु करुन निर्सगाच्या प्रकोपाने झालेल्या नुकशान भरपाई चा कायदा तयार करणे आवश्यक आहे.




