देवरीः- तालुक्यातील निसर्गाचा समतोल ढासळल्यामुळे तालुक्यात वातावरण हा पाऊसाने तापलेला आहे.संपुर्ण तालुक्यात धान पिक हे पुर्ण झालेले आहे.तालुक्यात ९७ टक्के पिक कापणी करण्याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत.काही शेतक-यांनी धानाची कापणी केलेली आहे. त्यांच्या कळपावरती पाणि साचल्यामुळे त्यांच्या धानाना अंकुर आलेले आहेत. शेतकरी वर्ग शासनाकडे आतुरतेने वाट बघत आहे.धानाची नुकशान भरपाई मिळावी तात्काळ पंचनामे करुन निधी शेतक-यांच्या खात्यात जमा करावी.शासन जी आर्थिक निधी शेतकरी लोकांना देते ती एवढी कमी असते की शेतकरी जो खर्च करतो तो पुर्ण निघत नाही. शेतकरी लोकांची मागणी आहे की स्वामीनाथन आयोग लागु करावे पण आज पर्यत शासनाने आयोग लागु केलेला नाही त्यामुळे शेतकरी लोकांना योग्य न्याय मिळत नाही.



