वंदेमातरम् गीताच्या १५०व्या वर्धापनदीनासाठी सालेकसात जय्यत तयारी

🔽शासन निर्देशानुसार तालुकास्तरीय समिती गठीत
🔽3 रोजी तहसील कार्यालयात नियोजन सभा संपन्न
सालेकसा/गोंदिया-:
कौशल्य रोजगार औद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई, विभागाअंतर्गत जनजाती नेता गुंडाधूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) सालेकसा संस्थेला दि. 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम गीताचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शासनाकडून तालुकास्तरीय समिती ठरवून देण्यात आली असून दि. 3 रोजी तहसील कार्यालयाचे दालनात मा. तहसीलदार सालेकसा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे नियोजनाबाबद सभा घेण्यात आले. वंदेमातरम गीताचा 150वा वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष नरसय्या कोंडागुर्ले तहसीलदार सालेकसा, गटविकास अधिकारी प.स. सालेकसा, आर. एन. माटे सहा. आयुक्त कौशल्य विकास विभाग गोंदिया, गटशिक्षणाधिकारी प.स. सालेकसा, जिल्हा व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सालेकसा, शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी म्हूणन डाँ. राजेंद्र बडोले, संत प्रतिनिधी म्हणून ज्ञानीदास महात्यागी तिरखेडी, क्रीडापट्टू म्हणून वैभव ब्राम्हणकर दर्रेकसा, साहित्यिक म्हणून जितेंद्र आसोले हेटीटोला, पत्रकार म्हणून तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे साखरीटोला, गडकिल्ले संवर्धन प्रतिनिधी म्हणून नत्थूलाल उईके धनेगाव, व्यवसायी प्रतिनिधी म्हणून कपूरचंद अग्रवाल सालेकसा, महिला गट प्रतिनिधी म्हणून सहारा लोकसंचालित साधन केंद्राच्या शालूताई साखरे, जनजाती चेतना प्रतिनिधी योगेश राहागंडाले, विश्व् हिंदू परिषदेचे बद्रीप्रसाद दशरिया, मोक्षधाम समितीचे राजेंद्र टेभंरे, व कार्यक्रमाचे आयोजक जनजाती नेता गुंडाधूर औधोंगिक प्रशिक्षण संस्था सालेकसाचे प्राचार्य बी.एन. तुमाडाम यांचा समावेश आहे. थोर कादंबरीकार, संपादक, कवी आणि तत्त्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या स्तुतीगीताला येत्या 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीयांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करण्यात मोलाचा वाटा असलेल्या या गीताचा वर्धापन दिन धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी समितीने नियोजन सुरू केले असून तहसील कार्यालय सालेकसाचे प्रांगणात कार्यक्रम होणार आहे.
दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी 9.30 ते 9.45 उद्घाटन, प्रस्तावना आणि मान्यवरांचा स्वागत सत्कार, 9.45 ते 10 वा. वंदेमातरम व आधारित लघु नाटिका सादरीकरण, 10 ते 10.10 वा. अध्यक्षांचे भाषण, 10.10 ते 10.30 मुख्य वक्त्याचे भाषण, 10.30 ते 10.35 समूहगायन संपूर्ण वंदे मातरम्, 10.35 ते 10.40 आभार प्रमाणे कार्यक्रम होणार असून कार्यक्रमादरम्यान शासकीय/निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, शाळा महाविद्यालयाचे विध्यार्थी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थां, महिला बचत गट, त्याशिवाय विविध संस्था आणि संघटना, सरकारी कर्मचारी हजारोच्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: वंदेमातरम् गीताच्या १५०व्या वर्धापनदीनासाठी सालेकसात जय्यत तयारी, ID: 30732

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर