सावली गावातील जनतेचा दारु विक्रीला प्रचंड विरोध
देवरीः- (दि.17) देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत सावली येथे दारु बंदीसाठी सलग तीन महिण्यापासुन सभा घेणे सुरु होते.ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदा सभा घेवुन दारु बंदीचा जोरात विरोध झाला त्यामध्ये संबधित अधिकारी आले असता त्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही.संबधित अधिकारी यांनी ग्रामसभा घेण्याचे सांगुन संबधित अधिकारी यांना माहीती पाठवावी असे सांगण्यात आले त्यांच्या सांगण्यावरुन ग्रामसभा घेण्यात आली.ग्रामसभा जेव्हा घेण्यात आली तेव्हा संपुर्ण गाव उपस्थित होता पण त्या ग्रामसभेत कोणत्याच विभागाचे अधिकारी आले नाही.त्यानंतर ग्रामपंचायत येथील संरपच व उपसंरपच संपुर्ण गावातील नागरिकांनी ग्रामसभेचा पाठपुरावा केला त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दि.17/02/2026 दिली होती. आज दि.17/02/2026 रोज मंगळवारला ग्रामपंचायत सावली येथे दारु बंदी साठी निवडणुक घेण्यात आली.निवडणुकीमध्ये संपुर्ण गावाने पुढाकार घेतला होता.राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक साहेब गोंदिया यांचे पत्र क्रं.सी.एल.आर.112012/1121/तीन-1188 नुसार ग्रामपंचायत सावलीच्या हद्दीत देशी दारु दुकान व संपुर्ण दारुबंदी करण्याची ग्रामसभा मा.श्री.जी.जी.मुनेश्वर विस्तार अधिकारी(पंचायत) पंचायत समिती देवरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.ग्रामसभा हजेरी रजिष्टर वर मतदारांची स्वाक्षरी घेण्यासाठी श्री.एस.पी.शहारे व श्री- एल के.नारनवरे ग्रामपंचायत अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.मतदार पडताडणीचे कामे श्री नाईक सर व मलगाम सर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार दारुबंदीसाठी मतदारसंख्येच्या 50% किंवा महिला मतदार संख्या 50% च्या वर असल्यास दारुबंदी करण्यात येते.मा.अध्यक्षांनी सर्व उपस्थित मतदारांना विचारले असता सर्व मतदारांनी एकमताने दारुबंदीसाठी हात वर केले.100% दारु बंदीसाठी ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.




