गोंदियाः- गोंदिया जिल्ह्यातील विशेष करुन गट ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्य यांचा कालावधी हा संपुष्टात आला.सरपंच कालावधी संपण्याआधी ग्रामपंचायत मधील निवडणुका घेतल्या जातात.निवडणुक घेवुन विजयी सदस्यांना जुन्या संरपच व सदस्यांची कालावधी संपली की लगेच पदभार सांभाळण्यासाठी त्यांच्या हातात दिला जातो.आज शासन कोणत्या कायद्याचा विचार करुन काही करण्याचे ठरविते हे नमके विचार करण्यासाठी गोष्ट आहे. गोंदिया जिल्ह्यात १८८ ग्रामपंचायत मध्ये मा.उच्च नायालय मुबंई खंडपीठ नागपुर यांनी रिट याचिका नं.१२५०/२०२६ अन्वये दिलेले न्याय निर्णय दि.२४/०२/२०२६ नुसार ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती आदेश काढण्यात आला.मागील प्रशासक या मध्ये अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.कालावधी संपणारे संरपच कोर्टात गेला की अधिकारी यांना प्रशासक म्हणुन नेमणुक करु नका.ग्रामपंचायत निवडणुक घेवुन नविन सरपंचाची नियुक्ती करा.शासन सरपंचाच्या दबावाखाली येवुन पुन्हा कायद्याचा दुरपयोग करुन सरपंचानाच प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आली.



