। आमगांव Elgar Live News :- सुरेंद्र कुमार खोब्रागडे द्वारा
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मागील 20 ते 25 वर्ष काम करून शासनाने 31 मार्च 2026 ला सर्व शिक्षा अभियान बंद करणार असल्याने उर्वरित आयुष्य कसे जगणार याकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू असतांना 9 मार्च पासून महाराष्ट्रातील समग्र च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आजाद मैदान येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आज आंदोलनाला 58 दिवस पुर्ण झाले परंतु या 58 दिवसात व उष्ण तापमानात उपाशी राहून कधी चक्का जाम तर कधी झाड़ावर चढून विरुगीरी तर पुरुष कर्मचाऱ्यानी मुंडन केले परंतु तरीही महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस च्या सरकारला पाझर फुटला नाही या आंदोलन काळात सरकारचा प्रतिनिधी म्हणून कुण्याही मंत्र्यानी आंदोलन स्थळाला भेट दिली नाही.
यावरून असे दिसून येते की या सरकारला उच्च शिक्षित तरुणांच्या भविष्याशी काही घेणंदेणं नाही ? एकीकडे 2 करोड सुशिक्षितांना रोजगार देण्याच्या वल्गना करून लागलेल्या लोंकाना बंद करून काय समाजाला काय सांगायचे हेच कळत नाही म्हणून या
– सरकारला प्रतिक्षा आंदोलनकर्त्यांच्या मरणाची?
तर नाही ना ? असा प्रश्न पडतो. त्या करिता
प्रगतीशील महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिला ‘मुंडण आंदोलन’ करण्याच्या तयारीत आहेत. शिक्षण विभागातील समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आलेली ही वेळ राज्य सरकारच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
दि. ९ मार्च २०२६ पासून राज्यभरातील तीन हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन करत आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २० एप्रिल रोजी पुरुष कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केले होते. मात्र, तरीही शासनाने दखल न घेतल्याने आता महिला कर्मचाऱ्यांनीही केशवपन करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
“सरकार आंदोलनकर्त्यांच्या मृत्यूची वाट पाहत आहे का?”
58 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे एकाही मंत्र्याने फिरकले नाही, ही बाब आंदोलनकर्त्यांच्या मनात संताप आणि असहायता निर्माण करणारी ठरत आहे. त्यामुळे 8 मे रोजी सर्व महिला कर्मचारी मुंडण आंदोलन करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने शासनाला दिला आहे. लाडक्या बहिणींना न्यायासाठी केशवपन?
देशात महिला सन्मान, आरक्षण आणि सक्षमीकरणाच्या चर्चा रंगत असताना, महाराष्ट्रातील महिलांना आपल्या हक्कासाठी 58 दिवस उन्हात उपोषण करावे लागणे ही शोकांतिका आहे. “लाडक्या बहिणी” म्हणवणाऱ्या महिलांनाच आज केस कापण्याचा निर्णय घ्यावा लागतोय, ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.२०-२५ वर्षांची सेवा, तरीही कायमत्व नाही
सन २००१ पासून सुरू असलेल्या समग्र शिक्षा अभियानात विषयसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखा सहाय्यक, एमआयएस कोऑर्डिनेटर, अभियंते, समन्वयक अशा विविध पदांवर सध्या 3378 कर्मचारी 6-6 महिन्यांच्या करारावर कार्यरत आहेत.20 ते 25 वर्ष सेवा करूनही कायम केले नाही. या दरम्यान 257 कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाला त्यांच्या कुंटुंबाला
कोणत्याही शासकीय सुविधा दिल्या नाहीत.अनेक जण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून कुणाचे 3 वर्ष तर कुनाचे फक्त 6 महिणे शिल्लक आहेत.
विशेष म्हणजे, 2024 मध्ये याच अभियानातील 3000 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले, मात्र उर्वरित कर्मचारी अजूनही कंत्राटीच आहेत, यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला असून मरायचेच आहे तर सौंदर्याला काय अर्थ त्या करिता स्वतःचे केश मुंडन करून या सरकारचा निषेध करण्याचे ठरवीले. ही माहिती महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीने दिली.



