वसतिगृह प्रवेश व स्वयंम योजनेसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन
गोंदिया, दि.15 : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये शासकीय वसतिगृह प्रवेश तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत अर्ज प्रक्रियेला दि. 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक तुषार गुरव यांनी केले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत मुलांच्या व मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये इयत्ता बारावीनंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक उच्च शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. वसतिगृह प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रथम वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करणे आवश्यक आहे. गुणवत्ता यादीच्या आधारे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज नियमानुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी विचारात घेतले जातील.
या प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाच्या https://hmasnew.mahait.org या ऑनलाइन पोर्टलचा वापर करावा. विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृह अथवा सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गोंदिया येथे दि.30 ऑक्टोबर 2026 पर्यंत सादर करावीत.
गोंदिया जिल्ह्यातील इतर मागास वर्ग (इमाव), विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र), दिव्यांग, अनाथ तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS) पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा.
प्रवेश प्रक्रिया, अर्ज भरणे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत अधिक माहितीसाठी ओबीसी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल किंवा सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे संपर्क साधावा. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: वसतिगृह प्रवेश व स्वयंम योजनेसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, ID: 31127

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर