गोदियाः- ग्रामपंचायत संगणक परिचालक हे सन २०११ पासुन ग्रामपंचायत संगणक परिचालक म्हणुन काम करीत आहेत.ग्रामपंचायत मधील सर्व कॅशबुक ऑनलाईन काम करणे.ग्रामपंचायत मधील ऑफलाईन सर्व कामे संगणक परिचालक यांच्या माध्यमातुन करण्यात येतात.ग्रामपंचायत मधील संरपच व ग्रामसेवक यांच्या तांत्रिक कामाचा महत्वाचा भाग संगणक परिचालक आहे.संगणक परिचालक हे गावातील नागरिकांना तहसिल कार्यालयातील संपुर्ण दाखले ग्रामपंचायत मधुन देण्यात येतात. ग्रामपंचायत मध्ये ज्या समस्या होत्या त्या समस्यावर तसेच शासनस्तरावरील समस्याबाबद सकारात्मक चर्चा करुन मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत मधील संगणक परिचालकांच्या समस्या सोडविण्याची हमी घेतली आहे.दिवाळीच्या आधी संगणक परिचालकांच्या मानधनाची मागणी सुध्दा पुर्ण करण्याचे काम करुन देण्याची ग्वाही दिलेली आहे. ग्रामपंचायत संगणक परिचालक समस्या निवारण सभा ही २०११ पासुन प्रथम असल्याची खात्री जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपल्या समस्या घेवुन आज समस्या निवारण सभेत उपस्थित होते. मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार संपूर्ण जिल्ह्यातील संगणक परिचालकांने मानले.




