निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला तयार करण्यासाठी 17 नोव्हेंबरला शिबिराचे आयोजन

गोंदिया, दि. 5 : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला सुलभता आणण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील उपकोषागार कार्यालयांमध्ये 17 नोव्हेंबर 2026 रोजी डिजिटल हयातीचा दाखला तयार करून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये निवृत्तीवेतनधारकांचे हयातीचे दाखले ‘डिजिटल जीवनप्रमाण’ (Digital Life Certificate) ॲपच्या माध्यमातून तयार करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँकेत प्रत्यक्ष जाऊन स्वतंत्रपणे स्वाक्षरी करण्याची आवश्यकता राहणार नाही. या सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांची वेळ व श्रम वाचणार असून दाखला सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी आपले आधार कार्ड, पीपीओ (Pension Payment Order) क्रमांक आणि बँकेचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे सोबत असल्यास डिजिटल हयातीचा दाखला तयार करण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
तरी जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपले हयातीचे दाखले विहित मुदतीत, म्हणजेच 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सादर करावेत आणि 17 नोव्हेंबर रोजी आयोजित शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोषागार अधिकारी मो. तौसिफ मो. हसीन आणि अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) समीर देशमुख यांनी केले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला तयार करण्यासाठी 17 नोव्हेंबरला शिबिराचे आयोजन, ID: 31295

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर