जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रलंबित त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना 18 नोव्हेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन

गोंदिया, दि. 5 : सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच CET, NEET, JEE यांसारख्या प्रवेश पात्रता परीक्षांमध्ये सहभागी झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या प्रस्तावांमधील त्रुटींची पूर्तता बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांनी केले आहे.
सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात दावा पडताळणीचे प्रस्ताव समिती कार्यालयात सादर केले आहेत. या प्रस्तावांची छाननी करताना काही प्रकरणांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. संबंधित अर्जदारांना या त्रुटींची माहिती त्यांच्या ई-मेलद्वारे, एसएमएस तसेच प्रत्यक्ष पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. मात्र, अद्यापही काही अर्जदारांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह त्रुटींची पूर्तता केलेली नाही.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या जात दावा पडताळणी प्रकरणांमध्ये त्रुटी प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांनी बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत आवश्यक त्या अतिरिक्त पुराव्यांसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी.
निर्धारित मुदतीत त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित प्रकरणांमध्ये समितीकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे नियमानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित प्रकरणे नस्तीबद्ध करण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रकरण प्रलंबित राहू नये, यासाठी संबंधित अर्जदारांनी विहित मुदतीत त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य डॉ. देवसुदन धारगावे यांनी केले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रलंबित त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना 18 नोव्हेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन, ID: 31301

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर