सामान्य माणसाच्या खिशात पैसा नाही का?महागाई आणि आर्थिक संकटाचा बाजार पेठेवर परिणाम देवरी (दि.०७) 1. महागाईचा वाढता भार: जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्यामुळे लोकांचा खर्च करण्याचा उत्साह कमी झाला आहे.
2. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती: शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा कमी आहे.
3. बेरोजगारी: तरुणांना रोजगार नसल्यामुळे कुटुंबांची खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आहे.
4. कमी पगार आणि बोनसचा अभाव: कामगारांना अपेक्षित पगारवाढ किंवा दिवाळी बोनस मिळत नसल्यामुळे खरेदीवर मर्यादा येतात.
5. कर्जाचा वाढता बोजा: घरखर्च, शिक्षण, आरोग्य आणि कर्जाचे हप्ते यामुळे सामान्य माणूस आर्थिक अडचणीत आहे.
6. ऑनलाइन खरेदीचा वाढता प्रभाव: अनेक ग्राहक बाजारात जाण्याऐवजी ऑनलाइन खरेदी करतात.
7. बचतीला प्राधान्य: भविष्यातील आर्थिक संकटाची भीती असल्यामुळे लोक अनावश्यक खर्च टाळत आहेत. दिवाळी म्हणजे आनंद,उत्साह आणि खरेदीचा सण मात्र बाजारपेठेत गर्दी कमी असेल,तर हा केवळ व्यापा-यांचा प्रश्न नाही.सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करण्याची गरज आहे. शेतक-यांला योग्य भाव,कामगाराला योग्य वेतन आणि बेरोजगार तरुणाला रोजगार मिळाला, तरच ख-या अर्थाने प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी होईल.




