पंचायत समिती सदस्यांनी कोणत्याच प्रकारच्या कायद्याची अंमलबजावणी केलीच नाही
देवरी- (दि.07) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (१) नुसार पंचायत समिती सदस्य हे कोणत्याही जागेवर अतिक्रमण करु शकत नाही अशा प्रकारचा दस्ताऐवज निवडणुक अधिकारी यांचे दिला जातो.चौकशी दरम्यान त्यांनी नगरपंचायत देवरी येथील प्रभाग क्रमांक २ झोन क्रमांक १ मालमत्ता क्रमांक 02010148 मध्ये 31.24 चौरस मिटर क्षेत्रफळ शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले असुन त्या जागेवर त्यांनी दुमजली ईमारत बांधकाम करुन स्वतःचा व्यवसाय करीत आहेत.याबाबतची नोंद नगरपंचायत कर आकारणी नोंदवहीतील अनुक्रमांक 148 वर आहे.पंचायत समिती अंतर्गत बांधकाम मंजुर करण्यात येत असुन सदर बांधकामा करिता साहीत्य पुरवण्यास पुरवठादारांकडुन निविदा मागविण्यात येते.अनिल बिसेन हे पंचायत समिती चे सदस्य असुन त्यांचे वडेगांव येथे एडीबी ट्रेडर्स आहे.व त्यामार्फत ते बांधकामाचे साहीत्य पुरविण्याचे काम करित असतात.त्यांनी ग्राम पंचायत मुल्ला येथिल पाईप लाईनच्या कामाकरिता विविध साहित्य एडीबी ट्रेडर्स मार्फत पुरवठा करुन लाखाचे बिल सादर केले व मंजुर करुन देयक उचल केलेले आहेत. पंचायत समिती सदस्य असुन त्यांनी कायद्याचा कोणत्याही प्रकारचा अवलंब न करता स्वर्मीजीने गाईचा गोठा,विहीरीचे बांधकाम सर्व स्वतःच्या घरात भरुन पंचायत समिती सदस्य पदाचा दुरउपयोग केला आहे.सविस्तर चौकशी ही ०६/०१/२०२६ रोजी तीन विषयावर अर्ज दाखल केलेला होता.सलग निर्णय हे प्राप्त तक्रार अर्जाच्या अनुसंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १६(१)(आय) व ५८ (१ई) नुसार श्री- अनिलकुमार दसाराम बिसेन सदस्य पंचायत समिती देवरी ,ता.देवरी जि.गोंदिया यांचा जिल्हा परिषदेच्या संविदेत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हितसंबध असल्याचे दिसुन येत असल्याने त्यांना सदस्य पदावरुन निरर्ह ठरविण्याचे आदेश ०४/११/२०२६ ला (विजयलक्ष्मी बिदरी) विभागीय आयुक्त नागपुर विभाग नागपुर यांनी दिले.




