Published:

Mumbai Police Arrested a Tailor Who Hijacks Lady Government Staffer Whatsapp; महिलेच्या मोबाईलवरुन ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना तसले मेसेज, मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर

मुंबई: वापरात नसलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून एका महिलेच्या ऑफिस ग्रुप्सवर चार अश्लील स्टिकर्स पाठवण्यात आले. जेव्हा महिलेला याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला. ही ४० वर्षीय महिला सरकारी विभागात कामाला असल्याची माहिती आहे. त्यानंतर तिने एलटी मार्ग पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी याप्रकरणी धारावीतील एका २९ वर्षीय टेलरला अटक केली आहे, ज्याने महिलेने बऱ्याच काळापासून न वापरलेला आणि रिचार्ज केलेला नसलेला मोबाईल नंबर मिळाल्यानंतर व्हॉट्सॲप डाउनलोड केला होता.तक्रारदार महिला ४ मे रोजी कार्यालयात पोहोचल्यावर त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना त्यांच्या नंबरवरून ऑफिसच्या दोन व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पाठवलेल्या स्टिकर्सबद्दल सांगितले. तेव्हा त्यांना घडलेला सारा प्रकार कळालं. महिलेने सहकाऱ्याला सांगितले की तिचे व्हॉट्सॲप कार्य करत नाही आणि ती कोणत्याही ग्रुपमध्ये मेसेज करू शकत नाही किंवा कोणाशीही संवाद साधू शकत नाही. त्यानंतर त्यांनी अ‍ॅडमिनला ग्रुपमधून त्यांचा नंबर काढून टाकण्यास सांगितलं आणि पोलिस तक्रार दाखल केली.

ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण
त्यांनी सांगितलं की तिने कॉल/एसएमएससाठी नंबर वापरला नाही किंवा तिने बऱ्याच काळापासून तो रिचार्ज केलेला नाही. तिने तिच्या हाउसिंग सोसायटीच्या व्हॉट्सॲप ॲडमिनला ग्रुपमधून तिचा नंबर काढून टाकण्याची विनंती केली.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, निरीक्षक मंगेश हांडे यांच्या नेतृत्वाखालील आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक दीक्षा पारवे आणि हेड कॉन्स्टेबल संतोष पवार यांच्या पथकाने तांत्रिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना आढळून आले की हा नंबर मध्य मुंबईतील कोणाला तरी देण्यात आला होता. ज्या व्यक्तीच्या नावाने हे सिमकार्ड जारी करण्यात आले होते त्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली आणि त्याने सांगितले की त्याचा मित्र अली इद्रीसी हा नंबर वापरत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तपासदरम्यान आढळून आले की आरोपीने तक्रारदाराच्या दोन ऑफिसच्या ग्रूपमधील काही महिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

अधिकाऱ्याने सांगितले की जेव्हा आरोपीने व्हॉट्सॲप डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलेच्या फोनवर तिचे व्हॉट्सॲप तपशील अपडेट करण्याबाबत सूचना पाठवण्यात आली. दरम्यान, आरोपी वापरत असलेल्या कॉलिंग नंबरवर एसएमएसद्वारे वन टाईम पासवर्ड (ओटीपी) पाठवण्यात आला. त्याने ओटीपी वापरला आणि व्हॉट्सॲप डाऊनलोड केल्यावर तक्रारदाराच्या व्हॉट्सॲपने काम करणे बंद केले. त्यानंतर इद्रीसने हा सारा कारनामा केला. सध्या पोलिस हे शोधत आहेत की, विवाहित इद्रीसी त्याच्या मित्राच्या कागदपत्रांवर सिम का वापरत होता, सध्या इद्रीसीवर आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder Mystery: पॉर्न पाहून डोक्यात राक्षस शिरला, ३० चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार अन् मग खून

Source link

Author:

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: Mumbai Police Arrested a Tailor Who Hijacks Lady Government Staffer Whatsapp; महिलेच्या मोबाईलवरुन ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना तसले मेसेज, मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर, ID: 27999

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर