गोंदियाः- (हरिहर पाथोडे ) अहिल्यादेवी_होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे खासदार सुनील मेंढे यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आले होते. एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आयोजित या शिबिरात प्रत्यक्ष शासकीय कार्यालयापर्यंत जाऊन आपल्या व्यथा, समस्या मांडू शकत नाही अशा महिलांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची संधी मिळाली. विविध विभागांच्या संबंधित असलेल्या अडचणींच्या अनुषंगाने विचार करून त्या सोडविण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचे हे पाऊल स्तुत्य असून या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त न होणाऱ्या महिलांना व्यक्त होण्याची संधी शासनाने दिली. मनोजजी बोपचे सभापती पं.स गोरेगांव, सचिनजी गोस्वामी तहसीलदार, राजकुमारजी यादव उपसभापती, रमेशजी पंधरे सदस्य पं. स, चित्रकलाताई चौधरी सदस्य पं.स ,सुप्रियाताई गणवीर सदस्य पं.स,शीतलताई बिसेन सदस्य पं.स ,ताराम ताई सदस्य पं.स, हरिणखेडडे साहेब तालुका कृषी अधिकारी, उके साहेब व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या
