आमगांवः- (सुरेंद्र खोब्रागडे) दिनांक ११ मे २०२३ ला झालेल्या रस्ता अपघातात प्रशिक मेश्राम रा.गोरठा यांचा अपघात कार क्रमांक एम.एच.२३ ए.डी.२२५६ ने न्यायाधिस शशिकांत संभाजीराव धपाटे यांनी स्वतःधडक दिल्याने प्रशिक चा गंभीर अपघात झाला .त्याच वेळेस बाईक स्वार लेखेश्वर भरतलाल भक्तवर्ती यांच्या बाईकला धडक दिल्यानंतर अनियंत्रित कार ने पायी चालणा-या प्रशिक मेश्राम ला धडक दिली.त्यात प्रशिक मेश्राम गंभीर जख्मी झाल्यावर ही त्याला तात्काळ दवाखाण्यात न नेता न्यायाधिस शशिकांंत धपाटे हे फोनवर बोलत होते.न्यायाधिस शशिकांत धपाटे हे स्वतः पोलिस ठाणे आमगांव येथे जावुन पोलिसांवर न्यायाधिस असल्याचा प्रभाव दाखवुन बाईक चालकां विरुद्ध तक्रार दाखल केली व त्यात पायी चालणा-या प्रशिक मेश्रामचा जाणुनबझुन उलेखच केला नाही. प्रथमच कार चालक विरुध्द गुन्हा दाखल न होता पोलिसांनी बाईक स्वार विरुध्द गुन्हा दाखल केले.हे आश्चर्यच आहे. करिता यांच्या वर अपघाती मृत्युचा गुन्हा दाखल करुन मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.प्रशिक मेश्राम यांचा अपघात करणा-या शशिकांत धपाटे पोलिस प्रशासना सोबत आपसात संगनमत करुन आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे.अशा पोलिस निरिक्षक युवराज हांडे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावा. आरोपी न्यायाधिस शशिकांत धपाटे यांनी हेतु पुरस्पर स्वतःला वाचविण्याकरिता आपल्या पदाचा गैर वापर करुन न्यायाधिस यांनी न्याय व्यवस्थेला मुठमाती देण्याचा प्रयत्न केला आहे.न्यायाधिस हे स्वतःला वाचविण्यासाठी पोलिस प्रशासनाला हाताचे बाहुले बनविले आहे. आरोपी न्यायाधिस शशिकांत धपाटे यांनी बाईक स्वार व पायी व्यक्तीला धडक देवुन ही आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. वरील अपघातात मरण पावल्या प्रशिकची आई देवागणा मेश्राम आणि भाऊ नशिब जेव्हा पोलिस स्टेशनला आरोपीच्या विरोधात तक्रार करायला वारंवार गेल्यावर तेथिल पोलिस अधिकारी फिर्यादीलाच प्रत्यक्ष साक्षीदार घेवुन या तरच गुन्हा नोंद होईल. अन्यथा गुन्हा नोंद करता येत नाही अशी धमकी फिर्यादीला देत आहेत. फिर्यादी अनुसुचित जातीने महार असुन गरीब विधवा आहे व हलाकीने जिवन जगत आहे. काल दिनांक ०१ जुन २०२३ ला झालेल्या पत्रकार परिषदेत मृत प्रशिक मेश्राम यांच्या अपघात प्रकरणाची सिआयडी व्दारे तपास करण्याची मागणी व आरोपी शशिकांत धपाटे गुन्हा दाखल करुन निलंबित करण्याची मागणी केली आहे. आता ही आरोपी वर गुन्हा दाखल न पोलिस प्रशासना व आरोपी विरुध्द दिनांक ०६ जुन २०२३ ला सामाजिक एकता मंच व वंचित बहुजन आघाडी आमगांव व सकल समाज व्दारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात येईल.
