देसाईगंज:- (हरिहर पाथोडे ) आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणात नि.शुल्क दमा औषधीचा वितरण करण्यात आलं. मृगनक्षत्र ज्या दिवशी आहे त्याच दिवशी हि औषधी दिली जाते.हि परंपरा अनेक वर्षापासुन सतत निरंतर चालु आहे.या माध्यमातून अनेक लाखो लोकांना याचा फायदा झालेला आहे. खासदार महोदयांनी सुद्धा या नि.शुल्क दमा औषधी चा लाभ घेतला.
या दमा औषधी खाण्यासाठी अनेक लांबून दुर दुरून लोक येत असतात.हि औषधी लहान मुलांपासून तर मोठ्यांना सुद्धा दिली जाते.या नि:शुल्क दमा औषधी लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आव्हान खासदार अशोकजी नेते यांनी केले. यावेळी आमदार कृष्णाजी गजबे,आमदार तथा माजी आदिवासी मंत्री अशोकजी उईके, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, अल्पसंख्यांक आघाडी मोर्चाचे बबलुभाई हुसैनी,जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा,तालुकाध्यक्ष राजू जेठानी, माजी नगराध्यक्षा शालुताई दंडवते, औषधी वैद्यराज प्रल्हाद सोमाजी कावळे,ओबिसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सुनिल पारधी,महामंत्री वसंत दोनाडकर, तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
