सिरपुरबांधः- पाटबंधारे विभाग सिरपुरबांध येथे शासकीय विश्रामगृह आहे.त्यामध्ये प्रशासकीय,लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ता यांंच्या सभा घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे.त्या ठिकाणी सर्व देखरेख पाटबंधारे विभागाच्या कर्मचा-यांची असते.त्या ठिकाणी मच्छीमार हे विना- परवानगीने शासकीय विश्रामगृहात राहत आहेत.त्यांना ईमारतीची किल्ली कुणामुळे देण्यात आली हे पण कळत नाही. कर्मचारी यांनी त्यांना वारंवार सांगितल्यानंतर सुध्दा ते ऐकण्यास तयार नाही. गावातील पोलिस पाटील व संरपच यांना माहीती देवुन त्यांना प्रत्यक्षात पाटबंधारे विभाग सिरपुरबांध येथे बोलवुन त्यांच्या समक्ष पंचनामा करुन त्यांना विश्रामगृहाच्या बाहेर राहण्यास सांगितल्यानंतर शुध्दा मच्छीमार हे राजकीय लोकांच्या धमक्या देवुन आपला ठिय्या सोडण्यास तयार नाही.त्यानंतर एल्गार लाईव्ह न्युज व लोकमत ने दखल घेतल्यानंतर तेथील उपविभागीय अभियंता सि.बी.डोंगरे हे येवुन त्यांच्या सामान शासकीय विश्रामगृहातुन बाहेर काढण्यात आला.तेवढ्यात सि.बी.डोंगरे उपविभागीय अभियांता आमगांव यांना एन.के.गडकरी साहेबाच्या सचिवाचा फोन आल्यावर त्यांना धमकी देवुन आपण कोन होता यांना बाहेर काढणारे त्यांना तेथच राहु द्या. जर अय़ोग्य निर्णयात एन .के.गडगरी साहेबाच्या सचिवाचा फोन येवुन शासकीय कर्मचारी व गावातील प्रमुख लोकांच्या निर्णयाला न मनता त्यांना काढण्यात येत नसेल तर त्याठिकाणी वरिष्ठ अधिका-यांचा सपोट असल्याचा सभ्रम होत आहे.