देवरीः- ग्रामपंचायत सिरपुरबांध येथे आज दि.२१/०६/२०२३ रोज बुधवारला आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सर्व आंगनवाडी मध्ये बालक व महीलांना योगाचे फायदे व जिवनात जसे अन्नाची गरज आहे.त्याच प्रमाणे योग करण्याची नितांत आवश्यकता आहे.आज देशात खान-पाणावर लोकांचे नियंत्रण व्यवस्थित नसल्यामुळे लोकांना कमी वयातच भरपुर रोगांचे शिकार होवुन त्यांचा जिवन हा अंधकारमय होवुन जातो. लोकांना आरोग्य हीच संपत्ती आहे याची जाणिव करुन देण्यात आली. आज प्रत्येक सामाजिक,शासकीय स्तरावरुन योगाचे महत्व पटवुन देण्यासाठी शासन शुध्दा खालच्या ग्रामपंचायत स्तरापर्यंत अंबलबजावणी करीत आहे.गावातील महीलांनी व पुरुषानी मार्गदर्शन व योग करण्यासाठी सहभाग नोंदविला होता.
