आमगांव:- मुंबई शेअर मार्केटच्या नावावर सध्या सुशिक्षित बेरोजगार व काही व्यावसायिक ट्रेडिंग करतात व नफा कमावतात पण यांत कितीतरी युवकांची फसवणूक होते. अशीच फसवणूक आमगांव तालुक्यातील शिवनी येथील दिलीपकुमार सुभाष मटाले (३४) या वेस्टीज ची शाॅपी लावुन आमगांव मध्ये व्यवसाय करणा-या युवकाची ३ लाख ५६ हजार ५७ रुपयांनी आरोपी विवेक शर्मा व संतोष तिवारी या दोघांनी बीएससी प्लस रेव्हेनू ट्रेडर्स या कंपनीच्या नावाने दिलीपकुमार मटाले यांना फोन करून “तुम्ही जे पैसे ट्रेडिंग करिता देणार त्यातील २० टक्के नफा ब्रोकर्स चार्जमधुन कपात करून ८० टक्के रूपये तुम्हाला परत करण्यात येतील” असे सांगीतले व दोन्ही आरोपींनी त्यांना व्हाटसअॅपवर आधार कार्ड,पॅनकार्ड,एक पासपोर्ट फोटो,बॅंकेचे पासबुक व को-या कागदांवर सही करून ही सर्व कागदपत्रे ईमेल वर पाठविण्यास सांगीतले व त्याची युजर आयडी देवुन त्यांना पासवर्ड दिला.
त्या पासवर्डवर त्यांच्या व्हाॅटसअॅपवर एक लिंक पाठवून ती लिंक ओपन करून त्यात युजर आयडी पासवर्ड टाका, असे सांगितले. ट्रेडिंग व दलाली ब्रोकरेजकरिता दिलीपकुमार मटाले यांनी विवेक शर्मा यांच्या अॅक्सिस बँके खात्यात ६ ते २७ मे दरम्यान ३ लाख ५६ हजार ५७ रुपयांचे ट्रांजेक्शन केले. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा नफा किंवा मुद्दल दिलेले नाही व त्यानी पैशाची मागणी सुरू ठेवली.यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिलीपकुमार मटाले यांनी आमगांव पोलिस स्टेशन गाठले.
यासंदर्भात २६ जून रोजी आरोपी विवेक शर्मा, संतोष तिवारी यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ३४ सहकलम ६६ सी ६६ डी माहिती तंत्रज्ञान अधिनियमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक युवराज हांडे करीत आहेत.
या प्रकरणा वरून तरी ट्रेडिंग करणा-यानी धडा घ्यावे व जागृत राहावे
