आमगांव:- (सुरेन्द्र खोब्रागडे) आमगांव येथील आंबेडकर चौकात बोअरवेल खोदणा-या ट्रक ने दुचाकीला मागेहुन धडक दिल्याने दुचाकी चालक ठार झाल्याची घटना १ जुलैला सायंकाळी ५:४५ वाजता घडली. राजेन्द्र पुरण रहीले (३९) रा. शिवनटोला (शिवणी) ता.आमगांव असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नांव आहे.
राजेंद्र रहिले हे बेरोजगारीवर मात करून शेतमजुरी सोबत शेतीला जोड व्यवसाय म्हणून बकरी पालन करीत होता.बक-या घेण्याकरिता गावातीलच अंकुश राखडे (२८) रा.शिवनटोला या तरूणासोबत मोटरसायकल एम एच ४० ए एस ७६२७ ने देवरी तालुक्यात गेले होते व बक-या खरेदी करून परत येत असतांना आमगांव येथील आंबेडकर चौकात वनविभागाच्या वनउपज तपासणी नाक्यासमोरच ट्रक एम एच ४० एन ३८७६ या वाहनाच्या धडकेत राजेन्द्र रहिले गंभीर जखमी झाला.त्याला उपचारासाठी आमगांव च्या ग्रामीण रूग्णालयात नेले परंतु तेथील डाॅक्टर ने स्थिती बघुन गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले परंतु गोदिया येथील डाॅक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले.त्याची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे.या घटने संदर्भात ट्रकचालक अखिल धुर्वे रा.बैतुल याच्यावर आमगांव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू , आंबेडकर चौक आमगांव येथील घटना, ID: 28590
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू , आंबेडकर चौक आमगांव येथील घटना, ID: 28590
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]