सालेकसाः- ( बाजीराव तरोणे) नगरपंचायत सालेकसा क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला असुन लाभार्थी उसने उधार करून घरकुलाचे बांधकाम करीत आहेत ऐनवेळी पावसाळा सुरू झाला आणि त्या लाभार्थ्यांना उघड्यावर येण्याची वेळ आली. घरकुलाचे बांधकाम सुरू असून अनेक महिन्यापासून त्या घरकुल बांधकामाचे थकीत हप्ते आणि उर्वरित निधी मिळाली नसून लाभार्थी संकटात सापडला आहे या लाभार्थ्यांची दखल घेत भारत राष्ट्र समिती तालुका सालेकसा चे वतीने नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांचे लाभार्थ्यांचे थकीत हप्ते उर्वरित निधी त्वरित मिळावी यासंबंधी नगरपंचायत प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली मागणी करताना भारत राष्ट्रीय समितीचे ब्रजभूषण बैस,बाजीराव तरोने, ललित किरसान, मायकल मेश्राम, वैभव हेमणे, सुरेश कुमरे, अक्षय भलावी प्रामुख्याने उपस्थित होते.

Author: Elgar Live News
Post Views: 153