देवरीः-वनहक्क कायदा २००६ अंतर्गत देवरी तालुक्यातील १२२ गावाना सामुहीक वनहक्क प्राप्त असुन कित्येक वर्ष लोटुनही अजुनपर्यंत सातबा-यावर त्यांच्या नोंदी चढविण्यात आलेल्या नाहीत.शासनाने रोजगार हमी योजने ची कामे वनहक्क समितीकडे सोपविले आहेत.वनसमितीच्या नावाने वनजमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या नोंदी चढविण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे वनसमिती कशा पध्दतीने काम करेल या बाबतीत खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत 2019 च्या हक्कनोंद शासन निर्णयाचे आधार घेत वनहक्क देवरी तालुका महासंघाच्या सिस्टमंडळाने मा. तहसीलदार देवरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केला.मा. तहसीलदार यांनी आठ दिवसाचे आत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून संयुक्त सभा लावू आणी प्रश्न मार्गी लावू असे आश्वसित केले.सिस्टमंडळाचे नेतृत्व विलास भोगारे तालुका महासंघ अध्यक्ष यांनी केले तर सावंत राऊत युवा नेते, ईश्वर मेश्राम महासंघ सचिव, कमलेश धमगाये, पुणेस भोयर, गुलसन भोगारे,नोहर भिसी, रिकम पुराम, देवेंद्र गावड, भास्कर अलोणे, मनोहर भोगारे,इत्यादी नागरीक उपस्थित होते.
