सालेकसाः- (बाजीराव तरोणे) सालेकसा तालुक्यातील तिरखेडी गावात असलेल्या महात्यागी आश्रमात प्रकृती संस्कृती परिषदेतर्फे दोन दिवसीय प्रकृती संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रकृती संस्कृती परिषदेचे प्रमुख स्वामी रामग्यानीदास महाराज महात्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली देशभरातील विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी परिषदेच्या उद्दिष्टांवर चर्चा करताना स्वामी राम ग्यानीदास महाराज म्हणाले की, भारतातील निसर्ग आणि संस्कृती नष्ट होत आहे. भारतीय शेती आणि ऋषी परंपरा नष्ट करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. परिस्थिती अशी झाली आहे की तो दिवस दूर नाही जेव्हा जल, जंगल, जमीन आणि प्राणी यांच्या अस्तित्वावर संकट येईल आणि मानव जातच विनाशाकडे वाटचाल करेल. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वामी राम मोहन दास म्हणाले की, प्रकृती संस्कृती परिषद हा एक ट्रस्ट आहे. याचे मुख्यालय अयोध्या, उत्तर प्रदेश येथे आहे. देशातील 630 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्हास्तरावर प्रकृती संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आम्ही संपूर्ण देशातील तरुणांना आवाहन करतो. प्रकृती संस्कृती परिषदेच्या या कार्यक्रमात हिमाचल प्रदेश चे स्वामी राम मोहन दास,बलदेव राज सूद, डॉ. के एल शर्मा, छत्तीसगढ़चे पूर्व विधायक नरेंद्र कुमार शर्मा,छत्तीसगढ़ उच्च न्यायालय चे अधिवक्ता सतीश कुमार त्रिपाठी, बिहार चे कौशलेंद्र नारायण, राजीव सिंह ,झारखंड प्रभात महाराज, स्वामी हरिनारायण, उड़ीसा चे रविंद्र बेहरा, मध्य प्रदेश छत्तीसगढ़ चे थनेंद्र साहू, भूषण साहू, गोंदिया महाराष्ट्र चे सौरभ पांडे, सोनू गौतम, दुर्गेश शर्मा, रमाकांत तिवारी, हीरा केवल चंद,अनीता अग्रवाल, शुधा अग्रवाल, ब्रह्मा देवी पोद्दार, हेमेंद्र पोद्दार, चंद्रशेखर आजाद, सोनेलाल कटारे, जगन राव, हम बोले, अंबालाल फुले सहीत सैकड़ों च्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
