सालेकसा: -Elgar Live
छतीसगड़ राज्याच्या बिजापुर वनविभागाने 6 जुलै ला बिजापुर येथे वाघाच्या कातडीसह 20 लोकांना अटक करून त्यांची सखोल चौकशी केली असता यात सालेकसा व आमगांव येथील आरोपींचा सहभाग असल्याचे सांगितले.यावरून आमगांव व सालेकसा तालुक्यातुन 11 आरोपींना रविवार (दि.9 जुलै) विजापुर वनविभागाच्या अधिका-यांनी अटक केली.
गोंदिया जिल्ह्याचा अधिकांश भाग हा जंगलाने व्यापलेला आहे व नवेगांव, नागझिरा व्याघ्र प्रकल्प असुन गोंदिया जिल्हयाला मध्यप्रदेश व छतीसगड़ राज्याची सिमा लागुन आहे त्यामुळे या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर आहे.त्यामुळेच वन्य प्राण्यांची तस्करी करणारी टोळी गोंदिया जिल्हयात सक्रिय असल्याची चर्चा होती यापैकी एका टोळीने सालेकसा तालुक्यातील शेरपारच्या जंगलात एका पट्टेदार वाघाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
वाघाचे कातडे,नखे,हाडे व मिशीचे केस हे छतीसगड़ राज्यातील बिजापुर येथील अमित झा आणि त्यांच्या सहकारी-यांना विकल्याचे कबुली दिली.याबाबत विजापुर वनविभागाने कार्यवाही करत अमित झा यांच्यासह या प्रकरणात 20 जणांना आरोपी अटक केली व त्यांची कसून चौकशी केली असता ही वाघाची कातडी सालेकसा तालुक्यातील शेरपार जंगलात वाघाची शिकार करून आणल्याची माहिती आरोपींनी दिली.त्यामुळे बिजापुर येथील वनविभागाचे पथक रविवारी गोंदिया जिल्हयात दाखल झाले व त्यांनी या प्रकरणातील सालेकसा व आमगांव येथील 11 आरोपींना अटक केली.
[ करंट लावुन केली वाघाची शिकार ]
मुख्य आरोपी शालिक मरकाम (55 कोसाटोला मुरपार)
सुरज मरकाम (45 कोसाटोला मुरपार) जियाराम मरकाम (42 नवाटोला सालेकसा) या तिघांनी मिळून वाघाला करंट लावुन त्याची शिकार केल्याची कबुली दिली.तर घटनास्थळावरून वाघाच्या हाडाचे तुकडे मिळाल्याचे छतीसगड़ वनविभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
(कातडे विकण्यासाठी मदत करणारे अटकेत)
यामुख्य तिघा आरोपींना वाघाची कातडी व अवयव विकण्यासाठी मदत करणा-या आरोपी मध्ये गेंदलाल भोयर (55 लभानधारणी) तुकाराम बघेले (59 भाडीपार) अंगराज कटरे (67 दरबडा) वामन फुंडे (60 सिंधीटोला) या चार आरोपींना सालेकसा येथे अटक करण्यात आली तर या विक्री करण्यास मदत करणारे आमगांव येथील शामराव शिवणकर 53, रेल्वेत नोकरी करणारे जितेंद्र पंडित आमगांव,यादवराव पंधरे बोदरा जि.भंडारा,अशोक खोटेले 50 गुदमा,गोंदिया अशा 11 लोकांना विजापुर वनविभागाने अटक करून छतीसगड़ येथे नेण्यात आले परंतु गोदिया वनविभाग या प्रकरणात अनभिज्ञ आहे याचे जिल्हा वासीयांना नवल वाटते.
