देवरीः- देवरी तालुक्यातील छत्तीसगढ सीमेला लागुन असलेला फुक्किमेटा / ढिवरीनटोला मार्ग ठरतयं यमराजाचे द्वार .
सविस्तर असे की .. अग्रवाल ग्लोबल कंपनी तर्फे माहामार्गवरील बांधकामकरीता मोठ मोठे दगड टीप्परनी या रत्यावरून वाहतुक करत असल्यामुळे या रस्त्याची अवस्था दैनिय अवस्था झाली असल्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन हे रस्ते अपघाताचे केंद्रबींदु ठरले आहे .
अग्रवाल ग्लोबल कंपनी पुराडा गावातुन ऐका शेतकऱ्याच्या शेतातुन दगड काढुन पुराडा ते ढिवरीनटोला ते मकरधोकडा मार्गे अनेक महीन्यापासुन वाहतुक करीत असून व अवैधपणे ओव्हरलोड गाडी भरून या रस्तेवर धावत आहे . मात्र रस्त्याचे हाल बेहाल होऊन डांबरीकरण रस्त्याची माती वर आली असुन इथुन वळणदारी करण्याऱ्या प्रवाश्याना तारेची कसरत करावा लागत आहे . तरीपन इथुनच शासन प्रशासन ये जा करत असुन सदर रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे . जर एखादी अनहोनी जानहानी झाली तर याचा जवाबदार कोन ? असा सवाल गावातील नागरीक व ये जा करणारे प्रवाशी याच्या म्हणामध्ये प्रश्नचीन्ह निर्मान झाला .सरपंचांनी विरोधी पवित्रा घेत या मार्गाने होणारी दगळाची वाहतूक बंद करण्याची मागणी तहसीलदारांना दुरध्वनी द्वारे केली होती. परंतु अजुनही त्या अग्रवाल ग्लोबल कपंनीची वाहतूक बंद झाली नसुन या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वर आलेली माती सतत अपघाताचे कारण ठरत आहे .
प्रतीक्रीया –
सरपंच – दिलीप जुळा
तहसीलदार साहेब ऐकायला तयार नाही फक्त हो म्हणतात पण शासन प्रशासनचा गावाकडे लक्ष नाही आहे.
माझ्या गावचा रस्ता आहे काही लोकं या ठिकाणी घसरून पडले आहेत याचा जिव गेला तर याचा जवाबदार कोन .
