ओबीसी च्या अधिकाराची माहीती व्हावी म्हणुन मंडल यात्रेचे आयोजन देवरी – ओबीसी जनजागरण आणि ओबीसी साठी शासनाचे धोरण काय असावेत यासाठी म्हणून मंडल आयोगाची स्थापना झाली होती. यामध्ये सर्वप्रथम संपूर्ण भारतात ओबीसीची जनगणना व्हावी यासाठी म्हणून मंडल आयोगाची भूमिका स्पष्ट होती. परंतु राजकीय दबाव तंत्रांमुळे संपूर्ण भारतात अद्याप ओबीसी जनगणनेवर कोणतीही स्पष्ट भूमिका शासनातर्फे व्यक्त करण्यात आलेली नाही. परंतु ओबीसी समाजातर्फे याबाबतची जनजागृती व्हावी यासाठी म्हणून मंडल यात्रा संपूर्ण विदर्भात मंडल यात्रा सुरू करण्यात आलेली आहे. येत्या 01 ऑगष्ट 2023 रोज मंगळवारला मंडल यात्रा देवरी शहरात दाखल होणार आहे. यासाठी धुकेश्वरी मंदिर सभागृह येथे भव्यसभेचे आयोजन सकाळी 10.00 वाजता करण्यात आले आहे. ओबीसी समाजातील नागरिक ओबीसी समाजासाठी धडपड करणाऱ्या सर्व सामाजिक संघटना यामध्ये आमंत्रित करण्यात आलेल्या आहेत. महा ज्योती संस्थेच्या योजनांची माहिती हे या सभेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी सेवा संघ ओबीसी संघर्ष कृती समिती ओबीसी कर्मचारी अधिवेशन महासंघ जिल्हा गोंदिया आणि तालुका देवरी यांनी केलेले आहे.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मंडल यात्रेचे संयोजक उमेश कोर्राम, संयोजक दीनानाथ वाघमारे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अनिल डहाके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत़. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून ओबीसी संघर्ष कृती समिती जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे आणि ओबीसी सेवा संघ जिल्हा अध्यक्ष प्राचार्य बी एम करमकर आहेत.