सिरपुरबांधः- जिल्हा गोंदिया पंचायत समिती देवरी ग्रामपंचायत सिरपुरबांध येथे केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे गावातील सर्व घटकांनी या अभियानात सहभागी व्हावे व देशातील सर्व क्षेत्रात प्रगती करावी.देशातील सर्व जनतेला पंचप्रण शपथ घेवुन देशाच्या व गावाच्या विकासाच्या सानिध्यात सर्वानी यावे. पंचप्रणाची शपथ आम्ही घेतो की,१)भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु . २) गुलामीची मानसिकता मुळापासुन नष्ट करु. ३)देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु. ४) भारताची एकात्मा बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणा-यांप्रती सन्मान बाळगु. ५) देशाचे नागरिक म्हणुन सर्व कर्तव्यांचे पालन करु. ग्रामपंचायत मध्ये गावातील नागरिक,ग्रामपंचायत पदाधिकारी,कर्मचारी सर्व आंगनवाडी सेविका,कृषी सखी,उपस्थित होते.