????
*साखरीटोला:-(रमेश चुटे) सालेकसा तालुका भाजप महिला आघाडीच्या वतीने अतीदुर्गम नक्षल प्रभावित मुरकुडोह/दंडारी पोलिस मदत केंद्रात जाऊन पोलीस बांधवाना राखी बांधून रक्षाबंधनाचा सन साजरा केला. आपल्या कुटूंबापासून दूर राहून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस बांधवाना या दिवशी देखील आपल्या बहिणीला वेळ देता येत नाही, ही अडचण लक्षात घेऊन 2 सप्टेंबर रोजी आपल्या पोलीसदादांना राखी बांधण्यासाठी सालेकसा तालुका भाजप महिला आघाडीच्या सदस्या गोंदिया जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सौ. सविताताई पुराम, पंचायत समिती सदस्या सौ.अर्चनाताई मडावी, जिल्हा महामंत्री सौ.प्रतिभाताई परिहार, तालुका अध्यक्ष सौ. मधुताई अग्रवाल, सौ. शालिनीताई बडोले, सौ.कविताताई येटरे, मुरकुडोह, दंडारी, टेकाटोला, क्रमांक 1, 2, 3, येथील आंगनवाड़ी सेविका लीलाबाई टेकाम, शिलाबाई चौरे, सुनिताबाई पंधरे, आनिताबाई टेकाम, बचत गटाच्या सचिव फूलाबाई टेकाम, यांनी थेट अतीदुर्गम व नक्षल प्रभावित मुरकुडोह/दंडारी येथील पोलिस मदत केंद्रात जाऊन पोलीसदादांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सन साजरा केला. भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र अशा प्रेमाचा सण आहे. भावा प्रति बहिणीचे असलेले प्रेम आणि बहिणीच्या प्रत्येक संकटामध्ये तिच्या पाठीमागे ठामपणे उभारणारा तिचा भाऊ हा भारतीय संस्कृतीमध्ये असलेला स्नेहसंबंध जगाच्या पाठीवर कोणत्याही देशांमध्ये पाहावयास मिळत नाही. कर्तव्यावर असलेले भाऊ आपल्या व्यस्त कामामुळे रक्षाबंधनांसाठी जाऊ शकले नाहीत अश्या पोलीसदादानां राखी बांधून रक्षाबंधन सन साजरा करण्यात आले असल्याने पोलीसदादांनी सुद्धा हर्ष व्यक्त केला.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: अतीदुर्गम मुरकुडोह/दंडारी पोलिस मदत केंद्रात रक्षाबंधन, ID: 28835
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: अतीदुर्गम मुरकुडोह/दंडारी पोलिस मदत केंद्रात रक्षाबंधन, ID: 28835
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]