मुंढरी व पालोरा येथे खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोंदिया-:
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार #मेरी_मिट्टी_मेरा_देश उपक्रमांतर्गत प्रत्येक गावातील माती गोळा करून ती दिल्ली येथील अमृत स्मृती वनाच्या ठिकाणी पाठविण्याच्या दृष्टीने मोहाडी तालुक्यातील मुंढरी आणि पालोरा येथे #कलश_यात्रा काढण्यात आले होते. कलश यात्रेत भंडारा/गोंदियाचे खासदार सुनीलभाऊ मेंढे अन्य मान्यवरांनी हातात कलश घेऊन घरोघरी जाऊन घरातील तुळशी वृंदावनातील माती कलशात समर्पित करण्याची विनंती केले असता गावकऱ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आले. आपली मातृभूमी व कर्तव्याची जाणीव प्रत्येकाला असावी आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर योद्धांच्या स्मृती चिरकाल राहाव्यात या हेतूने सदर उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास जात असल्याचे यावेळी उपस्थितांना सांगितले.
- गावकरी व शाळकरी विध्यार्थ्यांचा कलश यात्रेत स्वयंस्फूर्त सहभाग
यावेळी सर्वश्री भगवान चांदेवार तालुकाध्यक्ष, राजेंद्र शेंडे महामंत्री, बाबूजी ठवकर माजी जिल्हा परिषद सदस्य, रामराव कारेमोरे माजी जिल्हा परिषद सदस्य, जगदीश गोबाडे शक्ती केंद्रप्रमुख, निशिकांत इलमे, महेंद्र शेंडे माजी जिल्हा परिषद सदस्य, यादोवराव मुंगमोडे किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, भाऊराव लाडे, उपसरपंच, फुलचंद बांते शक्ती केंद्रप्रमुख, उमेश तुमसरे शक्ती केंद्रप्रमुख, गणेश कुकडे शक्ति केंद्रप्रमुख, शामा पिंगळे बूथ प्रमुख, भुपेश ईश्वरकर सोशल मीडिया प्रमुख व मोठया संख्येने ग्रामस्थ भाजप पदाधिकारी उपस्थित होते.