साखरीटोला-: (रमेश चुटे) राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या युवा कार्यकर्त्यां पक्ष संघटनेच्या माध्यमातून नेहमीच कार्यतत्पर राहणाऱ्या कु. शैफाली मुकेश जैन साखरीटोला/सातगाव तालुका सालेकसा यांची गोंदिया जिल्हा सोशल मीडिया फ्रंटच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने सोशल मीडिया फ्रंटचे प्रदेश अध्यक्ष महादेव बालगुडे यांनी नियुक्ती पत्र देऊन नेमणूक केले आहे. शरदचंद्रजी पवार व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची विचारधारा तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल अशी अपेक्षा करण्यात आले आहे. कु. शैफाली जैन यांची राकापा शरद पवार गटाच्या सोशल मीडिया फ्रंटच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी शैफालीचे अभिनंदन केले आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 742