????कुणबी समाज सेवा समितीचें पदाधिकारी सज्ज
????शिवजयंती दिनी सामाजिक प्रबोधन, गुणवंत विध्यार्थी, यशस्वी युवक युवतीचें सत्कार व विविध कार्यक्रम
साखरीटोला-: (रमेश चुटे) मराठी माणसाला ताठ मनाने जगायला शिकविणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती अवघ्या सात दिवसावर येऊन ठेपली आहे. दरम्यान सालेकसा येथील कुणबी समाज सेवा समितीने 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सवाची तयारी मोठया थाटामाटात सुरु केले असून वातावरणही शिवमय झाले आहे. 18 फेब्रुवारी रोजी विध्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, आणि सायंकाळी 7 वा. सालेकसा शहरात वाजत-गाजत शिवरायांचा जयजयकार करीत भव्य मशाल रॅली काढण्यात येणार आहे. 19 रोज सोमवारला सकाळी 10 वाजता घोड्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज व आई जिजाऊ सोबत शिव रॅली मिरवणुकीमध्ये विविध पारंपरिक वाद्यांची, झांज पथके शिवध्वज, व पारंपारिक वेशभूषा करून रॅली निघणार आहे. दुपारी 12 वा. सालेकसा येथील बस स्टॅन्ड परिसरात कार्यक्रमस्थळी रैलीची सांगता होणार असून शिवजयंतीचें थाटामाटात उदघाटन होणार आहे. याप्रसंगी समाजातील गुणवंत विध्यार्थी, विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या युवक युवतीचे स्मृतीचिन्ह प्रदान करून सत्कार केले जाणार आहे. सालेकसा येथील कुणबी समाज सेवा समिती र.न. 088/23 (गो.)च्या वतीने जय्यत तयारी सुरु असून शिवजयंतीचा आनंदोउत्सव साजरा करण्याकरिता तोरण, पताके, बैनर, शिव ध्वज, मशाली मोठया प्रमाणात तयार केले जात आहेत. 18 फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी 7 वा. शहरात वाजत-गाजत शिवरायांचा जयजयकार करीत मशाल रॅली काढण्यात येणार आहे. 19 रविवारला सकाळी 10 वा. शिव रॅली मिरवणुकीमध्ये विविध पारंपरिक वाद्यांची, झांज पथके शिवध्वज, व पारंपारिक वेशभूषा करून रॅली निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी परिसरामध्ये जय्यत तयारी आहे. 19 रोजी सायंकाळी 7 वाजता इंजिनियर पवन दवनंडे महाराज (सत्यपाल महाराज यांचे शिष्य) तुफानी विनोदी सुप्रसिद्ध कीर्तनकार यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कुणबी समाज सेवा समिती सालेकसाचे सचिन बहेकार, गौरीशंकर भेंडारकर, निलेश बोहरे, महेश बागडे, गिरजाशंकर मेंढे, विजय फुंडे, पारसनाथ थेर, सुभाष हेमने, रवी चुटे, अशोक खोटेले, श्याम येटरे, जितेंद्र शेंडे, प्रकाश चुटे, अजय डोये, सुरेश मेंढे, गोपीचंद शिवणकर, परमानंद शिवणकर, मनोज डोये, संजय बारसे, यशवंत शेंडे, राजकुमार बहेकार, पवन पाथोडे, बाजीराव तरोने, राजू फुंडे, कृष्णा मेंढे, संजय चुटे, किशोर चुटे युवा सेवा समिती चे दिशान्त फुंडे, तरुण मेंढे, रोहित शिवणकर, राजेश डोये, आदित्य डोनोडे, अविनाश बोहरे, रोहित चुटे, अस्विन बारसे, भावेश फुंडे, प्रवीण चुटे, विजय बहेकार, सचिन चुटे, मंगेश चुटे, कुणाल शिवणकर, निलेश बागडे, अनुप बागडे, आयुष मेंढे महिला सेवा समिती निशा बागडे, कविता येटरे, विद्या बोहरे, सरिता चुटे, लता फुंडे, शशी फुंडे, निर्मला बागडे, सुषमा मेंढे, अनिता चुटे, कविता चुटे, ममता बहेकार, सुनीता थेर, अर्चना चुटे युवती सेवा समिती माधवी बहेकार, पायल बहेकार, चेतना चुटे, अस्विनी येटरे, रशमी डोनोडे, दीक्षा चुटे, तेजशविनी बागडे परिश्रम घेत आहेत.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: शिवजयंती निमित्य सालेकसा येथे भव्य मशाल रैलीचें आयोजन, ID: 29501
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: शिवजयंती निमित्य सालेकसा येथे भव्य मशाल रैलीचें आयोजन, ID: 29501
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]