सहेषराम कोरेटे (आमदार) यांच्या निधीतुन कुनबी समाजाला १५ लाख समाजभवन बांधकामासाठी मंजुर देवरीः- (दि.१८/०२/२०२४ ) कुनबी समाजाला प्रबोधन मिळावं व समाजातील मेहनत करुन मोठ्या हुद्यावर जाणा-या व्यक्तीचे सत्कार समारंभ ठेवुन समाजातील व्यक्तीना प्रेरणा मिळावी त्यांनी शुध्दा आपल्या आयुष्यात चांगले काम करावे हा ध्येय कार्यक्रमाचे अध्यक्ष राम गायधने अध्यक्ष कुणबी समाजसेवा संस्था देवरी मार्गदर्शक पाहुणे व वक्ते गजानन कोरे (संचालक राष्ट्र निर्माण प्रशासकिय अ़़ॅकडमी अमरावती – यांनी युवकांनी स्वतःच्या विचाराने चालावे.जिवन आपले विचार दुस-्याचे असल्यामुळे आपल्या समाजाची प्रगती होत नाही.युवकांनी शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज,सयाजीराव गायकवाड,ज्योतीराव फुले,सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांचे वाचन करुन स्वतःचा विकास व समाजाचा विकास करावा असे आपल्या शब्दातुन व्यक्त केले. निळूभाऊ बहेकार से.नि. प्राचार्य एस एस कॉलेज गोंदिया- समाजाचा विकास झाला पण टक्केवारी कमी आहे.आजची पिढी ही विनाकारण कामात आपले जिवन वाया घालवित आहे ही समाजाची मोठी शोकांतिका आहे.मोबाईल हा आपले जिवन चांगला करण्यासाठी न करता वाईट करण्यासाठीच जास्त उपयोगी आजची पिढी करित आहे. सौ अनुपमाताई मेंढे प्राध्यापिका शिवाजी सायन्स कॉलेज नागपूर यांनी समाजाचा विकास करायचा असेल तर महीलांना सोबत घेणे आवश्यक आहे.शिक्षण घेवुन चुकीच्या प्रवाहात गेलो तर शिक्षणाचा काही उपयोग नाही. विजय भाऊ फुंडे संतोष पकोडे वाला नागपूर यांची यशस्वी उद्योजक त्यांनी आपल्या जिवनात आपले ध्येय निश्चित असले तर आपण निश्चित य़शस्वी होतो.
सूत्रसंचालन गणेश मुनेश्वर,हर्षदा कोनतो़डे व प्रास्ताविक भाषण रतिराम डोये सर व आभार प्रदर्शन जंजाळ सर यांनी केले.सर्व तालुक्यातील कुनबीबांधव उपस्थित राहुन कार्यक्रमाला सहकार्य केले.
