????खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नाला यश.
????अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत आमगांव रेल्वे स्टेशनसाठी 7.17 करोड रूपये मंजूर
साखरीटोला/गोंदिया-: (रमेश चुटे)
अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत देशभरात मान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, व्हिडिओ कॉम्प्रेसिंगच्या माध्यमातुन 554 रेल्वे स्टेशनचा पुर्णविकास व 1500 रोड ओवरब्रिज / अंडरपास कार्यक्रमाचें उद्घाटन 26 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले. गडचिरोली/चिमूर लोकसभा क्षेत्राचें खासदार अशोक नेते यांनी सतत पाठपुरावा केले असून त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. लोकसभा क्षेत्रातील तालुका आमगांव येथे अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत आमगांव रेल्वे स्टेशनचा पुर्णविकास कार्यक्रमाचें उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना खासदार अशोक नेते म्हणाले मी रेल्वेच्या रखडलेल्या कामांना मार्गी लावण्यासाठी सतत प्रश्न उपस्थित केले असल्याने आमगांव रेल्वे स्थानकांसाठी 7.17 करोड रूपये मंजूर झाले यामुळे आमगांव रेल्वे स्टेशनचा पूर्णतया कायापालट होणार आहे. पंतप्रधान मोदी साहेबाच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय व ऐतिहासिक विकास कामे होत आहेत. अमृत भारत रेल्वे स्थानक योजने अंतर्गत रेल्वे विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आले असून नागरिकांना आधुनिक सोयीसुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचें गोंदिया जिल्हाध्यक्ष ॲड. येसुलाल उपराडे, माजी आमदार केशवभाऊ मानकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, जि. प. सदस्य छब्बु ऊईके, आमगांव भाजपा तालुकाध्यक्ष राजु पटले, शहराध्यक्ष पिंटु अग्रवाल, जिल्हा सचिव नरेंद्र बाजपेई, यशवंत मानकर, राकेश शेंडे, अंजुताई बिसेन, ग्रामीन अध्यक्ष महिला आघाडी, सुषमा भुजाळे शहर अध्यक्ष महिला आघाडी, अनिरुद्ध शेडे, मनोज सोमवंसी, धनलाल मेंढे, परसराम फुंडे, मुन्ना बिसेन तसेच हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते, नागरिक, व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: आमगांव रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट, ID: 29567
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: आमगांव रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट, ID: 29567
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]