????ठाणा मार्गांवरील पानगाव ते साखरीटोला गावाच्या मधात असलेल्या पुलावर पडला मोठा खड्डा
????खड्ड्यांमुळे दररोज घडत आहेत अपघात
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
साखरीटोला ते ठाणा- व्हाया गोंदिया या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे. नागरिक आणि वाहनचालकांना पावला पावलांवर खड्ड्यांचा त्रास सहन करावे लागत आहे. एक खड्डा चुकवला तर दुसरा खड्डा सामोर येतो. परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. ठाणा मार्गांवरील पानगाव ते साखरीटोला गावाच्या मधात असलेल्या पुलावर मधोमध मोठा खड्डा पडला असल्याने वाहन चालकांना खड्ड्याची माहिती व्हावी म्हणून गावकऱ्यानी त्या खड्ड्यावर काळ्या व पाला पाचोळा मांडून ठेवला आहे आहे. तरी रात्री बे रात्री दरम्यान अप्रिय घटना नाकारता येत नाही.मात्र क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग गाळ झोपेत आहे. हायवे मार्गाने गोंदियाला जाते वेळी दोन रेल्वे फाटक रस्त्यात मिळत असल्यामुळे वाहन चालकांचा अधिकतर वेळ रेल्वे फाटक उभे राहण्यात जात असते त्यामुळे असंख्य वाहन चालक व रुग्ण वाहिका साखरीटोला- ठाणा मार्गावरून गोंदियाला जात असतात पुलावर मोठा खड्डा व रस्त्याची चाळण झाली असल्याने सदर मार्गांवरील वाहनाच्या संखेत घट झाली आहे. सालेकसा, साखरीटोला, कारूटोला, सातगाव, पानगाव, कवडी, वडद, गांधींटोला व परिसरातील नागरिकांना गोंदिया प्रवासासाठी तसेच रुग्णवाहिकेकरिता हा सरळ मार्ग आहे, रेल्वे क्रांसिंग किंवा चौकी मिळत नसल्याने लवकर पोहचण्यासाठी शार्टकट रस्ता आहे. मात्र जागोजागी खड्डेच-खड्डे पडले असल्यामुळे रस्ता बेहाल अवस्थेत आहे. शाळा महाविद्यालयात येणारे विधार्थी रुग्णवाहीका मोटारसायकल व चारचाकी वाहन चालकांना वेळोवेळी खड्डा वाचवून प्रवास करावा लागत असतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घ्यावी अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी नागरिकांची मागणी आहे.